PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मिळणार शांततेचा नोबेल?; पुरस्कार समितीतील सदस्याच्या विधानामुळे चर्चा

Nobel Prize : नोबेल पुरस्कार समितीचे एक पथक भारतात दाखल
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

PM Modi : शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य अॅस्ले तोजे यांनी याबबातचे संकेत दिले आहे.

नॉर्वेहून नोबेल पुरस्कार समितीचे एक पथक भारतात दाखल झाले आहे. यावेळी नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य अॅस्ले तोजे यांनी भारताचं भरभरुन कौतुक केलं आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थापही दिली आहे.

PM Narendra Modi
Parinay Fuke : गोसेखुर्द आणि कऱ्हांडला अभयारण्याच्या दुहेरी कोंडीतून अशी सुटली तीन गावे !

यावेळी तोजे म्हणाले, ''मी स्वत: पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. दोन देशांमधील युद्ध थांबवण्याची क्षमता आणि शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे. मोदींनी भारतात राबवलेल्या धोरणांमुळे भारत एक शक्तिशाली देश म्हणून विकसित होत आहे''.

''तसेच जगातील शांततेसाठी काम करत आहे. जगाने भारताकडून शिकण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींसारख्या शक्तिशाली नेत्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता आहे'', असं ते म्हणाले.

PM Narendra Modi
MNS : मनसेची `स्वप्नपुर्ती`, पोलिसांनी रोखली, मोर्चामुळे तणाव अन् धरपकड..

दरम्यान, नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य अॅस्ले तोजे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना हे वक्तव्य केल्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com