नैराश्यातून माजी मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टर नातीने संपवले जीवन

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
Soundarya Neeraj
Soundarya NeerajSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : भाजप (BJP) नेते व कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिचे नाव सौंदर्या नीरज असे असून, ती राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले आहे. डॉक्टर असलेल्या सौंदर्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सौंदर्या ही येडियुरप्पांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीची मुलगी होती. ती 30 वर्षांची होती. ती बंगळूरमधील एम.एस.रामय्या रुग्णालयात डॉक्टर होती. ती पतीसमवेत माऊंट कॅरमेल कॉलेजजवळील इमारतीत राहत होती. येडियुरप्पांच्या निवासस्थानापासून ही इमारत जवळच आहे. तिचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि तिला चार महिन्यांचे अपत्यही आहे. प्रसूती झाल्यापासून ती नैराश्यग्रस्त होती. यासाठी तिच्यावर उपचारही सुरू होते, अशी माहिती येडियुप्पांच्या कुटुंबीयांनीच दिली आहे. (Yediyurappa granddaughter commits suicide)

Soundarya Neeraj
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नितेश राणे 24 तासांतच शरण

आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सौंदर्याचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाऊरींग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी येडियुरप्पांच्या सांत्वनासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सौंदर्याचा पती नीरज याचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. सौंदर्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (Soundarya News Updates)

Soundarya Neeraj
धक्कादायक : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांनी चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. येडियुरप्पांनी गेल्या वर्षी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते 1983 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. ते लोकसभेवरही निवडून गेले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे केवळ आमदार म्हणून काम करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com