

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळाची फेररचना झाली असून, आता भाजपमधील संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे (B. S.Yediyurappa) पुत्र बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांना मंत्रिपद अथवा प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर विजयेंद्र यांनी पक्षनेतृत्वाकडे बोट दाखवले आहे.
राज्यातील मुख्यमंत्री बदलानंतर आता बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पक्ष संघटनेतील बदलांचे वारे वाहू लागले आहे. विजयेंद्र यांनी मंत्रिपद नाकारण्यात आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. असे असले तरी संघटनात्मक बदलांमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. विजयेंद्र यांच्याकडे सध्या पक्षाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. त्यामुळे उपाध्यक्ष असलेल्या विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष अथवा सरचिटणीसपदी बढती जाईल, अशी चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना विजयेंद्र म्हणाले की, माझ्या भविष्याचा फैसला पक्ष नेतृत्वच करेल. येडियुरप्पांनी सुरवातीला मोर्चे आणि सभा काढून पक्षासाठी संघर्ष केला. त्यांनी कधीही हे सर्व सत्तेत येण्यासाठी अथवा मंत्री किंवा मुख्यंत्री बनण्यासाठी केले नाही. याचप्रकारे माझे बंधू रंगण्णा (खासदार बी.वाय.राघवेंद्र) पक्षाच्या चौकटीत राहून काम करीत आहोत.
कोणत्याही पदाची अपेक्षा मनात ठेवून मी करीत नाहीत. माझ्या परिश्रमातून जनता मला ओळखेल. मला मंत्री अथवा प्रदेशा बनण्याची इच्छा नाही. आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून तो प्रादेशिक पक्षांसारखा नाही. आमच्या पक्षात राज्य आणि केंद्रातील नेते निर्णय घेत असतात. माझ्यावर कोणत्या वेळी कोणती जबाबदारी द्यायची, याचा निर्णय तेच घेतील, असेही विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पदावरून येडियुरप्पा पायउतार झाले असले तरी त्यांनी राज्य सोडून बाहेर जाण्यास ठाम नकार दिला आहे. याचबरोबर राज्यातील राजकारणात सक्रिय राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे सरकारवर नसला तरी पक्ष संघटनेवर वर्चस्व कायम ठेवण्याचा येडियुरप्पांचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांना पुत्रासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे,. मागील वेळीच विजयेंद्र यांनी सरचिटणीस व्हायचे होते. परंतु, हाय कमांडने याला नकार दिला होता. आता मंत्रिपद न दिल्याने विजयेंद्र प्रदेशाध्यक्ष अथवा सरचिटणीस पदावर दावा करू लागले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.