Mahua Moitra: तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांमध्ये युसुफ पठाणचाही समावेश! महुआ मोईत्रांनी सुनावलं; म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना...

Mahua Moitra: ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील आमदार-खासदार सैरभर झाले आहेत. त्यातून त्यांनी ममतांविरोधात बंड पुकारलं असून पक्षामध्ये उभी फूट पडली आहे.
Mahua Moitra_Yusuf Pathan
Mahua Moitra_Yusuf Pathan
Published on
Updated on

Mahua Moitra: ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील आमदार-खासदार सैरभर झाले आहेत. त्यातून त्यांनी ममतांविरोधात बंड पुकारलं असून पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. पक्षाचे ८० पैकी ६० आमदार फुटल्यानंतर आता २८ पैकी २० खासदारही फुटले आहेत. आमदारांप्रमाणं खासदारांनीही लोकसभेत वेगळा गट स्थापन केला. या २० खासदारांमध्ये माजी क्रिकेटर युसूफ पठाणचाही समावेश आहे. याच युसुफ पठाण यांना आता ममतांशी एकनिष्ठ असलेल्या महुआ मोईत्रा यांनी सुनावलं आहे.

Mahua Moitra_Yusuf Pathan
Maratha Andolan : विखेंच्या बंगल्यावर मराठ्यांचा ठिय्या! जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप

महुआ मोईत्रा यांनी बहरामपूरचे खासदार आणि माजी क्रिकेटर युसुफ पठाण यांनी बंडखोर गटाची बाजू घेत त्यांच्यासोबत जाण्याचा मार्ग स्विकारल्यानं आगपाखड केली आहे. मोईत्रा म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समन्स पाठवल्यानं युसुफ पठाण तातडीनं दिल्लीला गेले. पण जरातरी धैर्य दाखवायचं असा सल्ला देतानाच पठाण यांना त्यांनी जुन्या दिवसांची आठवण करुन दिली. जेव्हा युसुफ पठाण हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत होते. तुमच्या जिल्ह्यातील जनतेनं तुम्हाला मोठ्या फरकानं जिंकून देण्यासाठी मतदान केलं. त्यामुळं भाजपच्या वळचणीला जाताना थोडीतरी लाज बाळगायची होती, आपला कणा ताठ ठेवायचा होता.

Mahua Moitra_Yusuf Pathan
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा झटका! H-1B व्हिसाबाबत ऐतिहासिक निर्णय; लाखो भारतीयांना दिलासा!

त्याचबरोबर, महुआ मोईत्रा यांनी बंडखोरीच्या घटनानंतर तृणमूलच्या बंडखोर आमदारांवरही जोरदार टीका केली होती. बंड करणारे हे लोक पूर्णपणे बिनकमाचे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, तसंच हे लोक निव्वळ ममता बॅनर्जी यांच्या करिश्म्यावरच जगत होते, असा घणाघातही त्यांनी केला.

Mahua Moitra_Yusuf Pathan
Aurangabad DCC Bank : शिंदे-फडणवीस म्हणतात जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रित लढा, पण एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेत 'महायुती'त महाभारत!

दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्यासह सयानी घोष, अभिषेक बॅनर्जी हे सध्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत काय आहेत. पण आता तृणमूल काँग्रेसच्या संसदेतील आणि विधानसभेतील दोन तृतीयांश सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळं आणि आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता ते पक्षावर दावाही करु शकतात. त्यामुळं अल्पसंख्यांक झालेल्या ममतांना आता पक्षाचं चित्र आणि नाव दोन्ही गमवावं लागू शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com