Gokul Election: गोकुळचे संचालक उमेदवार अडचणीत? 'किकवी प्रकल्प अहवालातील धक्कादायक बाब ठाकरेसेनेकडून उघड

Gokul Dairy Election 2026: गोकुळ दूध संघाची निवडणूक स्थगिती करावी. या घोटाळ्यातील सर्व संचालकांकडून वसुली करून एसआयटी नेमावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून करण्यात आली.
Gokul Dairy Election 2026
Gokul Dairy Election 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: गोकुळ दूध संघातील माजी संचालकांनी खरेदी केलेल्या पुण्यातील किकवी प्रकल्पात 50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी याबाबत अहवाल देण्यात आला आहे.

यात खरेदी प्रकल्पमध्ये अनियमितता आढळून आल्याचा धक्कादायक अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळ मधील माजी संचालक आणि सध्या निवडणुकीला इच्छुक असणारे संचालक अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाची निवडणूक स्थगिती करावी. या घोटाळ्यातील सर्व संचालकांकडून वसुली करून एसआयटी नेमावी अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली.

सत्ताधारी संचालकांबाबत गोकुळच्या संचालिका महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार केल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये अनियमितता स्पष्ट झाली आहे. अशी परिस्थिती असताना आपण श्रमिका महाडिक यांच्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून पाहत होतो. मात्र त्या देखील आता गप्प का आहेत? यामध्ये सहभागी असणाऱ्या संचालकांवर कारवाईसाठी त्यांनी प्रयत्न करावेत असे देखील ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार यांनी म्हटले आहे. शिवाय ही निवडणूक रद्द करून या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

Gokul Dairy Election 2026
Teacher Recruitment Scam: शालार्थ आयडीच्या फाइल्स पुण्यात का मागवल्या? 1,764 संचिकांची SITकडून तपासणी

किकवी अहवालातील धक्कादायक बाबी

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 55 नुसार डेअरी प्लांट व जागा खरेदी करण्यापूर्वी संस्थेचे निबंधक यांची निधी गुंतवणूकिस मंजुरी घेतली नाही. जर तीन लाखपेक्षा अधिक रक्कम असेल तर त्यांना निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. पण तसे झाले नाही.

5 कोटी पेक्षा जास्त रक्कम असेल तर नोटीसीचा कालावधी किमान 15 दिवस बंधनकारक आहे. पण केवळ 7 दिवसाचा कालावधी दिला आहे. आलेल्या 3 निविदा पैकी दोन निविदा रद्द केल्या. त्यामुळे 1 निविदा आल्याने फेरनिविदा काढणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही.

बांधकाम दाखला नसताना आणि यां प्लांट बाबत त्रुटी असताना खरेदी व्यवहार केला आहे. शिवाय प्लांट मध्ये विविध गोष्टीवर 13 कोटींचा खर्च दाखवला आहे. खरेदीचे प्रत्यक्षात नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा व्यवहार खर्च मोघम असल्याचे अहवालत म्हंटले आहे. शिवाय खर्चाचा विनियोग कोणत्या करण्यासाठी केला याचे पुरावे नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com