
Gokul Sabha: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक आणि राजकीय नाडी म्हणून या गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वैरी असलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील विरुद्ध माझी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष टोकाचा बनला आहे.
२०२० च्या पंचवार्षिक निवडणुकीत हा संघर्ष आणखीन धारदार बनला. पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या महाडिक गटाची गोकुळ वरील सत्ता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या एकीने हिसकावून घेतली. तेव्हापासून आजपर्यंतच्या ३ वार्षिक सभेत महाडिक गटांकडून आमदार सतेज पाटील यांनाच टार्गेट करण्यात आले. मात्र यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ गट असाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला.
पुढील वर्षी होणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून सामोरे जात असताना राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेत महायुती म्हणून लढण्याचा पर्याय दिला आहे. मात्र मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाच्या पलीकडची मैत्री पाहता महाडिक गट मुश्रीफ यांच्या भूमिकेवर आतापासूनच संशय व्यक्त करत आहे. आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याला विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला.
वास्तविक संचालक वाढीच्या मागे कोल्हापूर जिल्हा बँकेतील मुश्रीफ पॅटर्न गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राबवला जाण्याची शंका महाडिक गटाला आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत जिल्ह्यातील सर्वच एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांना एकत्र करत जिल्हा बँकेत सत्ता स्थापन करण्यात मुश्रीफ यांनी यश मिळवले. तोच पर्याय संचालक वाढीच्या माध्यमातून गोकुळमध्ये राबवण्याच्या हालचाली खेळल्या जात असल्याचा आरोप महाडिक गटाचा आहे.
यंदाच्या वार्षिक सभेत मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करत सभेतील गोंधळ परंपरेला फाटा देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे विरोधाची धार कमी करत महाडिक यांनी काही मुद्द्यांवर विरोध करत सभासदांमध्येच बसण्याचा निर्णय घेतला. एकंदरीतच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मुलगा अध्यक्ष असताना पुढच्या सभेला गालबोट लागू नये, याची चिंता असल्याने महायुतीचा युतीधर्म पाळण्याची विनंती मुख्यमंत्र्यांच्या मार्फत महाडिक यांना केली. मात्र तरी देखील सभेच्या ठिकाणी प्रश्न विचारताना मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना उचकवणारा होता.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील त्यांनी विरोधात प्रचार केल्याने शिवसेनेच्या दरांची भूमिका त्यांच्या विरोधातील आहे. आगामी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा पर्याय आहे. अशातच मंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या सोयीची भूमिका घेण्यावर देत असल्याचा आरोप महायुतीतील काही नेत्यांचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सतेज पाटील यांच्यापेक्षा मंत्री मुश्रीफ यांची भूमिका महाडिक गटासाठी धोक्याची आहे. असा समज महाडिक गटाला आहे. त्यामुळे आतापासूनच मुश्रीफ यांची सावध खेळी, आणि महाडिक यांची तिरकी चाल ही एकमेकांच्या विरोधात संघर्ष निर्माण करण्याकडे चालली आहे.
वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे माझे लाडके भाऊ आहेत. तर वार्षिक सभेच्या व्यासपीठावरून प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने महाडिक यांनी थेट अध्यक्ष यांनाच लाडक्या भावाने फसवलं, त्यांनी पळपुटा भूमिका घेतली. असा थेट इशारा दिल्याने आगामी निवडणुकीतील संघर्षाची ठिणगीची आग कुठपर्यंत लागणार हे काळच ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.