Aaditya Thackeray: "भविष्यात देशात पुन्हा लोकशाही स्थापन होईल" म्हणत आदित्य ठाकरेंची सरकावर टीका; दिला ‘न्यूरेम्बर्ग ट्रायल्स’चा दाखला

Aaditya Thackeray criticised the government over the detention of protesters in Delhi: दिल्लीतील आंदोलनादरम्यान तरुणांना ताब्यात घेतल्याच्या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. भविष्यात लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाल्यावर जबाबदारांना जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

CJP Protest News : दिल्लीतील आंदोलनादरम्यान ध्रुव राठी, अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह हजारो तरुण-तरुणींना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईला त्यांनी ‘अपहरण’ असे म्हणत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ‘न्यूरेम्बर्ग ट्रायल्स’चाही दाखला दिला.

दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियावरुन सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांचे क्रुरपणे अपहरण केले जात आहे. भविष्यात सरकारचा लोकांसमोर न्यायनिवाडा होईल अशी टीपणी केली.

ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये ध्रुव राठी, अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांचे सरकारकडून अपहरण केल्याचा आरोप केला. आंदोलकांना क्रुरपणे ताब्यात घेण्यात येत असून हजारो आंदोलकांना उचलून बंदिस्त करण्यात आले यावर त्यांनी सवाल उपस्थित केला.

या कारवाईसाठी जे जबाबदार असतील त्यांनी 'न्यूरेम्बर्ग ट्रायल्स'ची आठवण ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला. भविष्यात देशात लोकशाही पुन्हा स्थापन होईल आणि निवडणुकीतील हेराफेरीविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना बंदिस्त केल्याबद्दल सरकारला जबाबदार धरले जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Aaditya Thackeray
MLC Election 2026: पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 1051 केंद्रांवर मतदान; 6900 कर्मचाऱ्यांची फौज तैनात

ध्रुव राठी यांचा अपहरणाचा दावा

युट्युबर ध्रुव राठी यांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. रविवारी सकाळी त्यांना सोडण्यात आले. यावर त्यांनी अपहरण केल्याचा दावा केला आहे. साध्या वेशातील व्यक्तींनी त्यांना घरातून नेले आणि सुमारे २३ तास वकिलाशी संपर्क साधू दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. ध्रुव राठी यांच्या पोस्टवरुन ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

Aaditya Thackeray
Maharashtra Drought 2026 : दुष्काळाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाने राज्यातील मंत्र्यासोबतच्या बैठकीत नोंदवली निरीक्षणे; मदतीबाबत CM फडणवीस म्हणाले...

काय आहे 'न्युरेमबर्ग ट्रायल्स'?

न्युरेमबर्ग खटले हे दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी जर्मनीच्या प्रमुख नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर चालवण्यात आलेले ऐतिहासिक न्यायालयीन खटले होते. दुसऱ्या महायुद्धात अडॉल्फ हिटलरच्या नाझी राजवटीने लाखो निष्पाप लोकांची कत्तल केली. युद्ध संपल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी मिळून या युद्धातील मुख्य गुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी या खटल्यांचे आयोजन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com