

Mumbai News : राज्यातील दुष्काळाच्या दाहकतेची पाहणी करण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून राज्यात केंद्राचे पाठ आले होते. या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली. राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल आणि पथकातील इतर सदस्यांनी राज्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. यावर्षी राज्यात पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे तरी काही ठिकाणी कमी पावसामुळे विहरी व नाले कोरडेठाक पडले आहेत. येत्या काळात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाने निदर्शने नोंदवली आहेत.
दुष्काळी परिस्थिती पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बैठक झाली. यावेळी गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील हे मंत्री उपस्थित होते. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्यासह केंद्रीय पथकाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादन कमी झाले. तूर सुद्धा प्रभावित झाली. पाण्याचे स्त्रोत प्रभावित झाला असून पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. केंद्रीय पथकाच्या प्रत्येक सदस्याने ही परिस्थिती सांगितली.
या बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पथकाने सर्वंकष दौरा केला, त्याबद्दल आभार मानले. मोठे कृषी संकट आहे. रब्बीवर सुद्धा संकट आहे. सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना द्यावी लागेल, असेही सीएम फडणवीस म्हणाले. येत्या काळात मदतीचा फोकस हा सामान्य शेतकरी आणि शेतमजूर असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राकडून अधिक मदत मिळावी. पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, राज्य सरकार संपूर्ण नियोजन करेल. संकटाला संधीत परावर्तित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पशुधन वाचवावे लागेल. पाण्याचे आरक्षण आम्ही केले आहे. प्राधान्य पिण्याचे पाणी आणि प्राण्यांसाठी पाणी असेच असल्याचे सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सर्वांच्या नजरा केंद्र सरकारच्या मदतीकडे
प्राथमिक निवेदन आम्ही सादर केले आहे. लवकरच अंतिम अहवाल सादर करू, असेही यावेळी केंद्रीय पथकाने म्हटले आहे. केंद्राकडून आता राज्याला किती मदत होते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मोठा दुष्काळ राज्यात पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता केंद्र सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.