Aaditya Thackeray on Vote Chori : आदित्य ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? 10-12 दिवसांपासून मुंबईतील शाखांंमध्ये जाऊन करतायेत तयारी...

Aaditya Thackeray Hints at Big Revelation : आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मतदार यादीमध्ये अनियमितता व ‘वोट चोरी’चे गंभीर आरोप केले आहेत. मागील 10-12 दिवसांपासून शाखांमध्ये जाऊन प्रारूप मतदार यादी तपासणी सुरू असल्याची माहिती.
Aaditya Thackeray on Vote Chori : आदित्य ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? 10-12 दिवसांपासून मुंबईतील शाखांंमध्ये जाऊन करतायेत तयारी...
Published on
Updated on

मुंबईतील मतदार यादीतील अनियमितता आणि ‘वोट चोरी’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, युवासेना प्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वोट चोरी थांबवणे हा फक्त निवडणुकीदरम्यानचा मुद्दा नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची पहिली पायरी आहे.

मागील दहा-बारा दिवसांपासून मुंबईतील विविध शाखांमध्ये भेटी देत असताना अनेक विसंगती आढळत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, “मुंबईच्या प्रारूप मतदार यादीवर आम्ही सातत्याने काम करत आहोत. शिवसैनिक आणि आमच्या संलग्न संघटना घरोघरी जाऊन तपास करत आहेत. दुबार नावे, चुकीने वगळलेले मतदार आणि यादीतील इतर घोळ ओळखून त्याची नोंद केली जाते आहे.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर आणणे किंवा मतदानाचे आवाहन करणे पुरेसे नाही. त्याआधी मतदार यादी शुद्ध, सुटसुटीत आणि अचूक असणे तितकेच गरजेचे आहे. “लोकशाहीत मतदार हा केंद्रबिंदू आहे. जर मतदारांची नावेच चुकीने वगळली गेली किंवा दुबार नोंदी वाढल्या, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या प्रामाणिकतेवर होतो. त्यामुळे वोट चोरी पकडणं म्हणजे लोकशाहीची पहिली सुरक्षा रेषा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Aaditya Thackeray on Vote Chori : आदित्य ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? 10-12 दिवसांपासून मुंबईतील शाखांंमध्ये जाऊन करतायेत तयारी...
Maharashtra Election History : एका मतानं बदलला इतिहास! वाजपेयींच्या सरकारला बसला होता मोठा झटका! तुमच्याही एका मतामध्ये दडली आहे ताकद

मुंबईसारख्या महानगरात स्थलांतर, पत्ता बदल, जुन्या नोंदी टिकून राहणे आणि यादी अपडेट न होण्यामुळे अनेक वेळा मतदारांच्या नावांमध्ये चुका राहतात. परंतु या चुका ‘जाणीवपूर्वक’ केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

नागरिकांनी स्वतःही आपल्या नावांची नोंद तपासावी, विसंगती असल्यास तक्रार करावी, असे आवाहन वारंवार केले जाते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मात्र या प्रक्रियेला व्यापक मोहीमेचे रूप दिले आहे. प्रत्येक प्रभागात पसंतीचे पथक घराघरांत जाऊन नावे तपासत असून, चुकीच्या नोंदींची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली जात आहे.

Aaditya Thackeray on Vote Chori : आदित्य ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? 10-12 दिवसांपासून मुंबईतील शाखांंमध्ये जाऊन करतायेत तयारी...
Gadhinglaj Election : उमेदवारांचे धाबे दणाणले! गडहिंग्लजमध्ये 'या' प्रभागाची निवडणूक पुढे ढकलली, नेमके कारण काय?

एकूणच, मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील पारदर्शकता हा मुद्दा पुढील काही दिवसांत अधिक गाजण्याची चिन्हे आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे हा विषय आता राजकीय वर्तुळासोबतच सामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com