Aaditya Thackeray : 'रडू नका, एवढी भीती होती तर मग...', आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले

Aaditya Thackeray vs Eknath Shinde News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Aaditya Thackeray, Eknath Shinde
Aaditya Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वरळी परिसरातील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते. दोघे समोरासमोर आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, त्यानंतर दोन्ही गटाच्या यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले आहे.

वरळीत नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोळीबांधवांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी समोरून जाताना खून्नस दिली असल्याची चर्चा आहे.

त्यातच याप्रकरणी त्यामुळे कोळीवाड्यात तणावाचे वातावरण असून मोठा राडा झाल्याची घटना घडली. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता आदित्य ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा शिंदेंना रडू नका, एवढी भिती होती मग वरळीत आलात का? असे म्हणत डिवचले.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
BJP Vs Shivsena : प्रभाग रचनेत फिक्सिंग : भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसेनेची तक्रार

वरळीतील कोळीवाड्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाली. या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.

पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करुन दिला. या पाच मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने मोठी घटना घडला नाही.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Hasan Mushrif political strategy : मुश्रीफ मुरब्बी नेता; राजीनाम्याच्या घोषणेने सहानुभूती मिळवत केली राजकारणाची नाळ घट्ट !

ड्रमायन या सर्व प्रकारानंतर रविवारी प्रसार माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोळीवाडा परिसरात तुम्ही तिथे होता तुम्हालाही माहिती असेल, तिथे किती पोलीस होते. खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे फेकनाथ मिंधे यांनी बंद करावे. राज्यात त्यांचे सरकार आहे ते आमच्यावर अर्बन नक्षल म्हणून देखील गुन्हा दाखल करतील. पण मिंधे यांनी हे सगळं बंद करावं, हे रडगाणं आहे. रडीचा डाव सुरु आहे. तुम्ही देखील तिथे पाहिले असेल तिथे चार चार कॅमेरे होते, आम्ही सर्वांना शांत करत होतो. तुम्ही सगळे तिथे उपस्थित होताच.'

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Sharad Pawar : 'दोघे भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली...', शरद पवारांचा गोप्यस्फोट

या ठिकाणी संपूर्णपणे पोलिसांची भिंत होती. इतकी भीती असेल तर तिकडे यायचे कशाला, तुम्ही तिकडे रोखून बघत होतात या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'काही झालेले नव्हते. मी फक्त एवढेच बघत होतो आपले सगळे कार्यकर्ते नीट आहेत ना, सगळे व्यवस्थित आहेत ना, तेवढेच. कोणाला काही व्हायला नको. कोळीवाड्यात आम्हाला शांतता पाळायची होती. त्याठिकाणी सण होता आणि तो सण साजरा करायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Eknath Khadse : चाकणकरांनी जावयाच्या मोबाईमधील डेटा बाहेर काढताच खडसे संतापले, म्हणाले, "सोयीनुसार महिलांची बदनामी..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com