Abu Azmi : अगोदर गरळ ओकली, आता अबू आझमींची सारवासारव; म्हणाले, 'आम्ही न्यायसुद्धा छत्रपतींच्या नावाने मागतो'

Abu Azmi Post On Aurangzeb : काहीच दिवसांपूर्वी सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक केले होते. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हटल्याने त्यांचे निलंबन झाले आहे.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत आले आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य अधिवेशनात केले होते. ज्याचे पडसाद राज्यभर उमटले. याच प्रकरणात त्यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबित केले. ज्यानंतर अबू आझमी यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. तसेच नार्वेकर यांना पत्र लिहत निलंबित मागे घ्यावे अशी मागणी केली होती. यानंतर आता आझमींची संभाजी महाराजांबाबतची पोस्ट व्हायरल होत असून त्याची चर्चा ही होत आहे.

आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे म्हणत त्याचे कौतुक केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात ही काही विधान केली होती. यामुळे दोन्ही सभागृहात मोठा वाद निर्माण झाला. तर या कौतुकाचे राजभर पडसाद उमटले होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करणारा प्रस्ताव दोन्ही सभागृहात ठेण्यात आला होता. ज्याला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्तावाला मान्यता देत त्यांचे अधिवेशन कालावधी संपेपर्यंत निलंबित केलं.

यावरून आझमी यांनी आपलं विधान मागे घेत, आपण दोन्ही छत्रपतींचा कधीच अपमान करू शकत नाही. आणि करणार ही नाही. पण आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून या विषयाला राजकीय वळण दिल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर आता आझमींचे नवे ट्विट व्हायरल होत असून यात त्यांनी, आम्हाला देशभक्ती व निष्ठा कोणीही शिकवू नये. आम्ही न्यायसुद्धा छत्रपतींच्या नावाने आणि आदर्शांवर मागतो. तुम्ही फक्त आजर्यंत छत्रपतींच्या नावावर राजकारण करतायं, असे म्हणत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना, जय हिंद! जय महाराष्ट्र! जय समाजवाद! म्हटलं आहे.

Abu Azmi
Abu Azmi : 'दोन्ही छत्रपतींचा आदरच करतोय, निलंबन रद्द करा'; अबू आझमींचे नार्वेकरांना पत्र

तसेच आणखी एक ट्विट त्यांनी केले असून त्यात त्यांनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शहादत दिनी विनम्र श्रद्धांजली, असेही म्हटलं आहे.

Abu Azmi
Imtiaz Jaleel On Abu Azmi : अबू आझमींच्या निलंबनाची कारवाई मला मान्य नाही! इम्तियाज जलील संतापले

नेमकं काय म्हणाले होते आझमी

चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही, असे विधान अबू आझमी यांनी केलं होतं.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com