Chandrakant Patil : "मॅनेज झाल्याचा ठपका नको म्हणून...", सांगली-सातारा विधान परिषदेच्या उमेदवारीवरून चंद्रकांत पाटलांनी 'मविआ'ला डिवचलं

Sangli-Satara MLC Election 2026 : सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेसाठी आज भाजपकडून धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज केल्यानंतर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 02 Jun : महाविकास आघाडीकडे विधान परिषदेसाठी संख्याबळ नसताना देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती म्हणून भाजपकडून धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती ही एक संघ असून 90% संख्याबळ एकट्या महायुतीकडे आहे.

विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. केवळ निवडणुकीत मॅनेज झाल्याचा ठपका पडू नये यासाठी विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची टीका सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'मविआ'वर केली आहे.

सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेसाठी आज भाजपकडून धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज केल्यानंतर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Chandrakant Patil
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा; म्हणाले, "मला गृहीत धरू नका, माझ्याकडून कधीही दगाफटका..."

हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला गेल्याने उमेदवारी धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ही विधान परिषद निवडणूक एकतर्फी होणार आहे. निवडणूक झालीच तर 90 टक्के मते महायुतीच्या बाजूची असतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Chandrakant Patil
TMC Crisis News: शिवसेना-राष्ट्रवादीनंतर आणखी एक पक्ष फुटणार? 50 आमदार बंडखोरीच्या पावित्र्यात

दरम्यान, महायुतीतील घटक पक्षाचे शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुती एक असताना शिवसेनेतून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, 'तानाजी पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. पालकमंत्री म्हणून मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा.' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांची समजूत काढतील, असंही पाटील यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com