Fadnavis BJP strategy : फडणवीसांचे आमदार-मंत्र्यांना 7 कानमंत्र : 'स्थानिकच्या' निवडणुकीसाठी ठरली भाजपची सिक्रेट स्ट्रॅटेजी

Political News: मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचे वर्चस्व होते. मात्र, आता शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचे प्लॅनिंग सुरु आहे.
Devendra-Fadnavis
Devendra-FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचे प्लॅनिंग भाजपने केले आहे. त्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचे वर्चस्व होते. मात्र, आता शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचे प्लॅनिंग सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची भाजपने (Bjp) जोरात तयारी सुरु केली आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार व मंत्र्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला आहे. त्यामुळे या सूचनांचे आमदार, मंत्री पालन करणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Devendra-Fadnavis
BJP extortion case : भाजप मंत्री अन् नेत्यांचा निकटवर्तीय निघाला खंडणीखोर; पोलिसांनी ठोकल्या बड्या, न्यायालयानं सुनावली कोठडी

सीएम फडणवीस (devendra Fadnavis) यांनी वर्षा या निवासस्थानी आमदार व मंत्र्यासाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजन आणि झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला. यावेळी महायुतीत वाद निर्माण होईल, अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचनाही फडणवीसांनी आमदारांना दिल्या आहेत.

Devendra-Fadnavis
Uddhav-Raj Thackery: तब्बल 20 वर्षानंतर ठाकरेंच्या वाघांची एकाच व्यासपीठावरुन होणार गर्जना! 2005 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

महायुतीत वाद निर्माण होईल, अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचनाही फडणवीसांनी आमदारांना दिल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळू नये, याची काळजी घ्या. आपल्या भागात राहून काम करा. त्यासोसोबतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय व्हा आणि आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून काम करा. सभागृहात सर्व आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित रहा अशा महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Devendra-Fadnavis
Raj-Uddhav Thackeray : अखेर शिक्कामोर्तब! राज-उद्धव ठाकरेंचे पहिल्यांदाच संयुक्त निवेदन; म्हणाले, गुलाल उधळत या…

त्यासोबतच येत्या काळात सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्यासही सांगितले आहे. सीएम फडणवीस यांनी स्नेहभोजनाच्या निमित्ताने उपस्थित आमदार व मंत्र्यांना येत्या काळात निवडणूका असल्याने सक्रिय राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Devendra-Fadnavis
NCP Politics : बंडखोरांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा ‘यू-टर्न’! आभा पांडे पुन्हा पक्षात

मुंबई महापालिका निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्वानी अंग झटकून कामाला लागण्याच्या सूचना त्यानी केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपचे आमदार व मंत्री सीएम फडणवीस यांनी दिलेल्या कान मंत्राचे पालन करणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Devendra-Fadnavis
Raj Thackrey Politics: नाशिकमध्ये मनेसेने केली शिवसेनेची परतफेड, राज आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा नवा अध्याय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com