Sachin Ahir : एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतरही सचिन अहिर सेफ राहणार : पक्षांतर बंदी कायद्यातील 'एका' तरतुदीचा मिळणार फायदा

Adv Asim Sarode statement on Sachin Ahir: पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात सचिन अहिर यांना संरक्षण मिळू शकते का? याबाबत कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
Adv Asim Sarode, Eknath Shinde
Adv Asim Sarode, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Sachin Ahir News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अहिर यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये महायुतीला यश मिळताना दिसत आहे. याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी साथ सोडल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता ठाकरेंचा विश्वासू आमदार फोडला. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Adv Asim Sarode, Eknath Shinde
Kolhapur: कोल्हापूरमध्ये तब्बल 243 एकर जमिनीचा घोळ : पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यामुळे अहिर यांच्या उमेदवारीमागे महायुतीचे पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. मात्र यामुळेच आता सचिन अहिर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

या प्रकरणाच्या कायदेशीर बाबींवर बोलताना कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षांतर बंदी कायद्यातील परिच्छेद क्रमांक 5 अंतर्गत काही घटनात्मक पदांना विशेष संरक्षण देण्यात आले आहे. विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झालेल्या व्यक्तीवर त्या पदावर कार्यरत असताना अपात्रतेची कारवाई लागू होत नाही.

Adv Asim Sarode, Eknath Shinde
Navi Mumbai Police Transfer: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठा फेरबदल; 10 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

सरोदे यांनी स्पष्ट केले की लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधानपरिषदेचे सभापती आणि उपसभापती या पदांवरील व्यक्तींना पक्षांतर बंदीच्या काही तरतुदींमधून सूट मिळते. संबंधित पदावर असेपर्यंत त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करणे अपेक्षित असते. एकदा का हे पद सोडले आणि ते पुन्हा मूळ राजकीय पक्षात गेले तरीही अपात्रतेची कारवाई होत नाही.

सचिन अहिरांनी पक्षांतर केलंच नसल्याची चर्चा :

एका बाजूला सचिन अहिर यांना घटनात्मक संरक्षण मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी पक्षांतरच केलं नसल्याची चर्चा आहे. सचिन अहिर 20 जून 2022 रोजी निवडून आले आहेत. 8 जुलै 2022 रोजी त्यांची टर्म सुरु झाली. 7 जुलै 2028 पर्यंत त्यांची टर्म शिल्लक आहे. 20 जून रोजी ते निवडून आले त्यावेळी शिवसेना पक्ष एकत्र होता. तेव्हा त्यांनी शिवसेना पक्ष एकत्र होता. त्यांनी शिवसेना पक्षाकडून अर्ज भरला आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. रेकॉर्डला ते शिवसेनेचे आमदार म्हणून असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com