Maharashtra Government : चौंडीमध्ये CM फडणवीस अन् मंत्रिमंडळाला 'नगरी मेन्यू'; राम शिंदे स्व:खर्चाने करणार 'खास पाहुणचार'

Maharashtra Government News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुढील महिनाभर त्यांचे जन्मगाव चौंडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Maharashtra cabinet meeting 3
Maharashtra cabinet meeting 3Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुढील महिनाभर त्यांचे जन्मगाव चौंडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज (6 मे) राज्य मंत्रिमंडळाची बैठकही चौंडीमध्ये पार पडणार आहे. मागील 75 वर्षांत राज्य सरकारच्या वतीने प्रथमच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्ताने चौंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, सचिव आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळ बैठकीस प्रारंभ होणार असून, ही बैठक साधारण 3 तास चालणार आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बैठक संपेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी विकास आराखड्याला मूर्त स्वरूप देण्यासह चौंडीशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय होणार आहेत.

Maharashtra cabinet meeting 3
Congress Vs BJP : "काँग्रेसला फोडा..." : बावनकुळेंच्या डोक्यात 'भाजप वाढवायचा' की 'लोकशाही संपवायचा' प्लॅन?

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सुतगिरणीच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याबरोबरच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्ता व सीना नदीवरील घाट बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या ऐतिहासिक बैठकीची जोरदार तयारी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. बैठकीसाठी चौंडी येथे सुसज्ज मंडप उभारला असून, ग्रीन रूम्स प्रसाधनगृह, बॅरिकेडिंगसह इतर आनुषंगिक कामे करण्यात आली आहेत. बैठकीसाठी विद्युतीकरण, ध्वनिक्षेपण, वातानुकूलन यंत्रणा, जनित्र, सीसीटीव्ही व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा व्यवस्था केली आहे.

Maharashtra cabinet meeting 3
Narayan Patil meets Ram Shinde : राम शिंदे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत; पवारसाहेबांच्या आमदारानं घेतली भेट, बंद दाराआड दोघांमध्ये बरचं काही शिजलं

पाहुण्यासाठी राम शिंदे यांचा पाहुणचार :

चौंडी हे राम शिंदे यांचे घरच आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीसाठी आज घरी येणाऱ्या पाहुण्याचा राम शिंदे खास पाहुणचार करणार आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, प्रशासकीय अधिकारी, पोलिस बंदोबस्त राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जवळपास दोन ते तीन हजार व्यक्तींचा जेवणाचा बेत आखण्यात आला आहे. हा सर्व जेवणाचा खर्च राम शिंदे स्वत: करणार आहेत.

खास नगरी मेन्यू :

चौंडीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी कर्जतची सुप्रसिद्ध शिपी आमटी, मासवडी, कोथिंबीर वडी, खवा पोळी, पुरणपोळी, थालीपीठ, पुलाव, कुरडई, हुरडा, शेंगोळे, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, मटकी, मसाला वांगे, बाजरी भाकरी, आमरस-चपाती, हुलग्याचे शेंगोळे, आलू वडी, मूग भजी, शेवगा भाजी, ठेचा-भाकरी, म्हैसूर बौंडा, मांडे, बीट थालपीठ या महाराष्ट्रीयन मेन्यूचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com