MLC By-Election: अजित पवारांसमोर विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कोते पाटील अन् सिद्दीकी हे दोन तगडे पर्याय, कुणाच्या पारड्यात वजन टाकणार?

Ajit Pawar NCP Politics : विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी थोपवताना अजित पवारांनी अनेकांना विधानपरिषदेचा शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. कारण जागा 1 आणि इच्छुकांची संख्या 100 पेक्षा अधिक अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीसाठी 10 ते 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत असणार आहे. तर 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांसमोर (Ajit Pawar) एका जागेसाठी दोन तगड्या नावांचा पर्याय उपलब्ध असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेसाठी या निवडणुकीसाठी भाजप-3, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 1 आणि एकनाथ शिंदे शिवसेना 1 असाच फॉर्म्युला असणार आहे. पण या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी शंभरहून अधिक जण इच्छुक असून त्यांनी गल्ली ते मंत्रालयापर्यंत जोरदार फिल्डिंगही लावली असल्याची चर्चा आहे. त्यातच एका जागेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीतील ( NCP ) शंभर जणांच्या शर्यतीत शिर्डीचे संग्राम कोते व वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार झिशान सिद्दीकी ही 2 नावं आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी थोपवताना अजित पवारांनी अनेकांना विधानपरिषदेचा शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. कारण जागा 1 आणि इच्छुकांची संख्या 100 पेक्षा अधिक अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका जागेसाठी एकाचंच नावं द्यावं लागणार असून उरलेल्या 99 जणांची नाराजांची मनधरणी करण्यासाठी अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावेळी अजित पवार राज्यपाल नियुक्त 6 अधिकृत जागांपैकी एका जागेचा शब्द इतरांना पुन्हा देण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
Solapur Shivsena UBT : सोलापुरातील पडझडीनंतर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ‘डॅमेज कंट्रोल’साठी बैठक; पदाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ शब्द!

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन नावं सध्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत. त्यात एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक व आंदोलक चेहरा असलेले शिर्डीचे संग्राम कोते पाटील आणि दुसरं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार झिशान सिद्दीकी हे आहेत. या दोन्ही नेत्यांच्या नावांचे पर्याय अजित पवारांकडे आहे. त्यातच आनंद परांजपेंचाही तगडा तिसरा पर्याय अजित पवार ऐनवेळी काढण्याची शक्यता आहे.

शिर्डीचे संग्राम कोते पाटील यांची जमेची बाजू म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक व आंदोलक चेहरा आहेत. ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवकचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. विरोधी बाकावर असताना सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलनाच्या माध्यमांतून त्यांनी पाच लाख कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत लढाई छेडली होती. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये अर्थात 2014 ते 2019 याकाळात त्यांनी राष्ट्रवादीचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवला होता.124 मोर्चे आणि साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्याचंही ते ठणकावून सांगतात.

Ajit Pawar
Pratap Patil Chikhlikar V/S Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा 'मोहरा' ठरतोय भारी! माजी आमदारांच्या प्रवेशाने चिखलीकरांची काॅलर टाईट

विशेष म्हणजे संग्राम कोते यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे मामा आहेत. काँग्रेसमधील संधी नाकारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहूनच आपली राजकीय वाटचाल केली. राष्ट्रवादीच्या फुटीवेळी त्यांनी अजित पवारांचं नेतृत्व मान्य केलं. या सगळ्याची दखल अजित पवार घेत त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ टाकणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलं विधानपरिषदेच्या निवडणुकीतील एका जागेसाठी दुसरं नाव अजित पवारांचे निकटवर्तीय व दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचं आहे.

झिशान सिद्दीकी यांना नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वमधून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी आता विधान परिषदेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एक तरुण चेहरा आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुस्लिम मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी अजित पवार झिशान सिद्दीकींचा हुकमी पत्ता बाहेर काढू शकतात.

Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder : "हात हलवत परत आलास, आमची इज्जत घालवलीस" : विष्णू चाटेने केलेल्या अपमानाने घुले पेटला

महायुतीकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सिद्दीकी मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरू शकतात. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे वांद्रे पूर्वसारखा मतदारसंघ गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सिद्दीकींना बळ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच माध्यमातून बाबा सिद्दीकींच्या मृत्युनंतरची भावनिक लाटही अजित पवारांसाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायदेशीर ठरू शकते. हेच गणित लक्षात घेऊन अजित पवार धक्कातंत्राचा वापर करत सिद्दीकींना आमदारकीची संधी देणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com