Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजप खासदाराचे मोठे भाष्य; कोल्हापूरच्या हद्दवाढीचेही दिले संकेत

Dhananjay Mahadik Statement : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लांबचा जिल्हा मिळाला आहे. पण, त्यांना जवळचा जिल्हा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते ज्येष्ठ नेते असून लवकरच वरिष्ठ त्यांचा विचार करतील.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 30 January : कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. सातत्याने आंदोलन पाठपुरावा करूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हद्दवाढ मागे पडली आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या शहरवासीयांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हद्दवाढीची धग वाढत असतानाच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी येत्या काही दिवसांत हद्दवाढ होण्याचे संकेत दिले आहेत.

कोल्हापुरात हस्तकला प्रदर्शनाच्या उद्‍घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ‘शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अशी माझी नेहमीच भूमिका राहिलेली आहे. परवा पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हद्दवाढीबाबत सकारात्मक बैठक झाली. हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच शहराची हद्दवाढ होईल, अशी ग्वाही राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत (Local Body Election) बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी २५ फेब्रुवारीला आहे. त्याच दिवशी याबाबतचा निकाल येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आहे. साधारणपणे २५ मेच्या आधी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील.

Dhananjay Mahadik
Beed Politics : बीड दौऱ्यावर येताच अजितदादांचा मोठा निर्णय, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सुरेश धसांसह 'या' आमदाराला डीपीडीसीतून हटवलं

पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबतही खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केले आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रिपदावरून धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत महाडिक म्हणाले, राज्यातील विरोधकांकडूनच पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजी असल्याचं सांगितली जात आहे. मात्र, महायुतीमध्ये सर्व आनंदी आहेत.

Dhananjay Mahadik
Ajit Pawar : "मकोका लावायलाही..."; बीडमधील घटनांवरून अजितदादा भडकले, धनंजय मुंडे शेजारी उभे असतानाच दिला इशारा

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लांबचा जिल्हा मिळाला आहे. पण, त्यांना जवळचा जिल्हा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते ज्येष्ठ नेते असून लवकरच वरिष्ठ त्यांचा विचार करतील. लवकरच त्यांना जवळचा जिल्हा मिळेल, असा दावाही धनंजय महाडिक यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com