Uddhav Thackeray solution: कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणणार? अजितदादांची अडचण उद्धव ठाकरेंनी झटक्यात दूर केली

Ajit pawar loan waiver issue News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही केलीली कर्जमुक्ती राज्यातील शेतकरी आजही विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरसकट कर्जमुक्ती करण्याची गरज आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कर्जमाफी न झाल्यास शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही केलीली कर्जमुक्ती राज्यातील शेतकरी आजही विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरसकट कर्जमुक्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी हे सांगत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अडचण सोडवत पीएम केअर फ़ंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा मार्ग सुचवला असून अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी ही मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येत असलेल्या निधीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. येत्या काळात त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्याशिवाय राज्य सरकार पीक विम्याचा घोटाळा वेगळाच असल्याचे सांगत येत्या काळात शेतकऱ्यांची मागणी लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Uddha Thackery Politics : एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा मोठा झटका! तब्बल 15 माजी नगरसेवकांची घरवापसी?

शेतकऱ्यांना बँकांची नोटीस आली आहे. त्यांनी ती आमच्या शाखेत आणून द्यावे. बाकी काही करायचे ते मी पाहतो. कर्जमाफीसाठी पंचांग बघून मुहूर्त बघणार आहात का? असे सांगत वेळप्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे इशारा त्यांनी दिला.

Uddhav Thackeray
Ajit Pawar : अजितदादांनी घेतली शरद पवारांच्या आमदाराची फिरकी; ‘लोक आमदार-बिमदार झाल्यावर वाढतात, आपण...’

कोरोना काळात पीएम केअर फ़ंडात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. हा निधी राज्यातील शेतकऱ्यांना देऊन कर्जमुक्त करा, संकटातील शेतकऱ्याना धीर देण्यासाठी पंतप्रधानांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की जाहीर केलीली मदत तुटपुंजी आहे ती वाढवून हवी असेही त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray
Eknath Shinde Politics : तानाजी सावंतांचे मंत्रिपद पक्के! शिंदेंच्या 'या' दोन मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा?

राज्य सरकारने अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. शेत साफ करण्याचा खर्च, कर्जाचा खर्च फार आहे. जमिनीची वाताहत झाली आहे, ती नीट करण्याचा खर्च आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Ajit Pawar announcement: बीडमधील पाहणीनंतर अजित पवारांची मोठी घोषणा; आजपासूनच शेतकऱ्यांना केली जाणार इतक्या रुपयांची मदत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com