Ajit Pawar announcement: बीडमधील पाहणीनंतर अजित पवारांची मोठी घोषणा; आजपासूनच शेतकऱ्यांना केली जाणार इतक्या रुपयांची मदत

Ajit Pawar Beed visit News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर अजितदादांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यात आलेल्या महापुरामुळे शेतातील उभे पिक वाहून गेले आहे. त्यातच पूरपरिस्थतीमुळे शेळ्या-मेंढ्या आणि वासरे वाहून गेली आहेत. अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी केली जात आहे.

गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर अजितदादांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली. या संकटाच्या काळात राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घराचे पावसाने जास्त नुकसान झाले आहे. त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.

Ajit Pawar
Uddhav Thackeray : धाराशिवमधील बांधावर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंचे मोठे आश्वासन; म्हणाले, 'हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत...'

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा त्यांनी यावेळी केली. या संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घरात पावसाने जास्त नुकसान झाले आहे. त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ पाच हजार रुपये रोख आणि काही धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Ajit Pawar
BJP office burnt : लडाखमध्ये तरुणाईचा भडका, भाजपचं कार्यालय पेटवलं; ‘या’ मागणीने जोर धरल्याने वाढली मोदी सरकारची चिंता

माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, या संकटाचा कोणीही गैरफायदा घेऊ नका. तसेच, फोन आणि पैशांच्या व्यवहारांबाबत काळजी घ्या. तुमचा पालकमंत्री या नात्याने मी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत आहे. तुम्हाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, याची खात्री बाळगा, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Vijay Waddettiwar Politics: विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, ओबीसी महामंडळांसाठी काय दिले?

बीडमध्ये मी बुधवारी रात्री उशीरा पोचलो आहे. त्यामुळे पाहणी करण्यासाठी गुरुवारी थोडा उशीर झाला. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनीही विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. या संकटातून नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Ajit Pawar
Eknath Shinde Politics : तानाजी सावंतांचे मंत्रिपद पक्के! शिंदेंच्या 'या' दोन मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा?

काळजी घेण्याचे केले शेतकऱ्यांना आवाहन

हवामान खात्याने पुढील काळातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करणे हेच आमचे धोरण आहे. कोणीही गैरसमज पसरवून राजकारण करू नये. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार करायला हवा. शासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांना अधिकाऱ्याच्या मिशीची भुरळ; स्टेजवर बोलवले अन् म्हटले,'वा काय मस्त...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com