Dharmaraobaba Atram kidnapping plot : माजी मंत्री आत्राम यांच्या अपहरणामागचा ‘मास्टरमाइंड’? 10 कोटींचं बक्षीस, नक्षलच्या खतरनाक कमांडरांनी पोलिसांसमोर टाकली शस्त्रं

15 Naxals Behind Dharmaraobaba Atram Kidnap Plot Surrender : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च दोन नेत्यासह 15 पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करल्याची माहिती आहे.
Dharmaraobaba Atram kidnapping plot
Dharmaraobaba Atram kidnapping plotSarkarnama
Published on
Updated on

Naxal surrender : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अन् विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अपहरणाच्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक, तसंच दहा कोटीचं बक्षीस असलेला, माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा, जहाल नक्षलवादी नेता थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी यानं शरणागती पत्कारल्याची माहिती समोर आली आहे.

तसंच केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी ऊर्फ संग्राम याच्यासह आणखी 15 पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी तेलंगण राज्यातील आसिफाबाद पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

छत्तीसगडच्या दहा हजारांहून अधिक पोलिसांनी करेगुट्टा डोंगरावर या नक्षलवाद्यांना एप्रिल-मे 2025 मध्ये घेरले होते. या अभियानादरम्यान 21 मे रोजी नक्षलवाद्यांचा (Naxal) देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू ठार झाला होता. त्यानंतर तिरुपती थिप्परी ऊर्फ देवजी यास राष्ट्रीय सरचिटणीस बनविण्यात आले होते.

माओवाद्यांचा मिलिटरी कमांडचा प्रमुख माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीला छत्तीसगड पोलिसांनी (Police) 18 नोव्हेंबर 2025 ला ठार केले. त्यानंतर देवजी हाही शरण येणार अशी चर्चा होती. अखेर रविवारी त्याने मुलूगू जिल्ह्यात शस्त्रांसह शरणागती पत्करली.

Dharmaraobaba Atram kidnapping plot
NCP leader rape case : अभिषेक कळमकर याचा काळा कारनामा; मोठ्या ताईंची शांतता की समर्थन? चित्रा वाघांचा सडेतोड हल्ला

तेलंगण पोलिसांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ते दोन दिवसात ही घोषणा होऊ शकते. मूळचा तेलंगणातील करीमनगर (जगतीयाल जिल्हा) इथला रहिवासी असलेल्या देवजीवर महाराष्ट्र, तेलंगणासह विविध राज्यांत एकूण दहा कोटींचे बक्षीस होते.

Dharmaraobaba Atram kidnapping plot
India AI Impact Conference 2026 : इंडिया AI इम्पॅक्ट परिषद 2026; 'दिल्ली घोषणापत्र' नेमकं काय ठरलं, झटपट समजून घ्या!

देवजी (थिप्परी तिरुपती) हा 1991 मध्ये झालेल्या माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अपहरणाच्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचे मानले जाते. आमदार आत्राम हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.

देवजीनंतर आता या नक्षल चळवळीत मोजकेच नेते शिल्लक आहेत. त्यात मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती (वय 75), मिशीर बेसरा (वय 63), मल्ला राजी रेड्डी ऊर्फ संग्राम (वय 73)यांचा समावेश आहे. त्यातील गणपती प्रकृती ठीक नसल्यामुळे अनेक दिवसांपासून भूमिगत असल्याचे कळते. देवजीच्या शरणागतीनंतर चळवळीची जबाबदारी मिशीर बेसराकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com