ajit pawar plane crash : अजितदादांच्या अपघातावरील प्राथमिक अहवालावर जय पवारांची नाराजी : पारदर्शक तपासाची मागणी

jay pawar questions On AAIB Report : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत 'विमान अपघात तपास ब्युरो' (AAIB) च्या प्राथमिक अहवालावर जय पवार यांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली होती. पण त्यांनी थेट प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
ajit pawar plane crash; jay pawar
ajit pawar plane crash; jay pawarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले; या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे.

  2. एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या २२ पानी प्राथमिक अहवालानुसार विमान आधी झाडांवर आदळले, नंतर जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर आग लागली.

  3. DGCA ने VSR च्या संपूर्ण ताफ्याचे संचालन थांबवण्याचा विचार करावा, अशी मागणी करत अहवालावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Pune News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. या घटनेला २८ फेब्रुवारीला एक महिना पूर्ण झाला असून एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात एएआयबीचा अहवालही समोर आला आहे. या २२ पानांच्या प्राथमिक अहवालात विविध निष्कर्ष मांडण्यात आले असून विमान आधी झाडांवर आदळले नंतर जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर विमानाला आग लागल्याचं म्हटलं आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी आधीच टीका केली आहे, ज्याची राज्यभर चर्चा झाली. याचदरम्यान आता जय पवार यांनी AAIB च्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एएआयबीने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता, VFR (Visual Flight Rules) नियमांचं उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही अशा विविध गोष्टींवर एएआयबीने बोट ठेवलं आहे. पण या अहवालावर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर प्रतिक्रिया देताना मोठी चूक दाखवून दिली होती.

त्यांनी, अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ कडे लक्ष वेधत “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” असे वाक्य वापरलं आहे. यावरून AAIB हा अहवाल किती गांभीर्याने बनवला आहे हे दाखवण्यासाठी पुरेसं असल्याची टीका केली होती.

ajit pawar plane crash; jay pawar
Ajit Pawar plane crash report : अंतिम क्षणी काय घडलं! 'Oh S**t…' नंतर काय? अजितदादांच्या विमान अपघाताबाबत 'AAIB'च्या अहवालात काय-काय?

आता याच अहवालावर अजित पवार यांचे धाकडे चिरंजीव जय पवार यांनी देखील नाराजी व्यक्त करताना खंत व्यक्त केलीय. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट शेअर एएआयसीबीने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत.

महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वकष उत्तरे मिळालीच पाहिजेत. डिजिसीएने ज्या मुद्द्यांवर VSR ची काही विमाने ग्राऊंड केली आहेत. त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

जर सुरक्षासंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR च्या विमानांबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राध्यान्य देत. आवश्यक असल्यास VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही डिजिसीएने विचार करायला हवा अशी अपेक्षा जय पवार यांनी व्यक्त केली आहे.

एएआयबीच्या प्राथमिक अहवालात काय?

-पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नानंतर गो अराऊंड.

-पहिल्या लँडिंगचा प्रयत्न धावपट्टी ११ वर

-दृश्यमानता कमी असताना लँडिंगचा प्रयत्न.

-विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला ५० मीटरवर कोसळलं.

-अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमधून “Ohh Shit” आवाज.

-विमान अपघातावेळी आधी झाडांवर कोसळलं नंतर जमिनीवर.

-अपघातानंतर विमानाला आग लागली.

एएआयबीने या गोष्टींवर ठेवलं बोट?

-दुष्यमानता VFR मर्यादेपेक्षा कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न.

-एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.

-बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही.

-हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.

-तसेच CVR/FDR च्या सविस्तर विश्लेषणानंतर अपघाताचं कारण समोर येईल.

ajit pawar plane crash; jay pawar
Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमानाच्या अपघाताची दोनच प्रमुख कारणे?अहवालामधून मिळाले स्पष्ट संकेत...

FAQs :

1. अपघात कधी झाला होता?
२८ जानेवारी रोजी विमान अपघात झाला होता.

2. AAIB अहवालात काय म्हटले आहे?
विमान आधी झाडांवर आदळले, नंतर जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर आग लागल्याचे नमूद केले आहे.

3. अहवालावर कोणांनी टीका केली आहे?
रोहित पवार आणि जय पवार यांनी अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

4. VSR संदर्भात काय मागणी करण्यात आली आहे?
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी VSR च्या संपूर्ण विमान ताफ्याचे संचालन बंद करण्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

5. पुढील कारवाई कोण करणार?
डिजिसीए आवश्यक असल्यास पुढील तपास व कारवाई करू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com