- सचिन देशपांडे
Champat Rai : अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीबाबात मोठा खुलासा श्रीराम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी केला आहे. त्यांनी रामलल्लाची मुर्ती अतिशय रेखीव, आकर्षक असल्याच सांगत या मुर्तीच्या तीन वैशिष्ट्यांचा उल्लेख केला. प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या या मुर्तीमध्ये पाच वर्षाचे बालकत्व जपले गेले आहे. इतकेच नाहीतर दशरथ नंदन अर्थात राजाचा मुलगा, असे भाव देखील जपले गेले आहे.
इतक्यावरच चंपत राय (Champat Rai) थांबले नाही, तर या मुर्तीत ‘देवत्व’ अगदी स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगत रामलल्लाच्या मुर्तीचे वर्णन अधोरेखित केले. मुर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य चंपत राय यांनी सांगितले ते म्हणजे काळ्या दगडात कोरलेली आहे आणि 4 फुट 3 इंचाची ही मुर्ती असल्याचे सांगितले. अयोध्येत राम मंदिरचा उद्धाटन सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. तीन मजली राम मंदिराचा एक एक भाग तयार होत पुर्णत्वाकडे नेला जात आहे.
जगभरातील हिंदू या राम मंदिर सोहळ्याची वाट पाहत असून त्याच बरोबर रामलल्लाच्या रेखीव मुर्तीची सर्वांना प्रतिक्षा आहे. सुमारे 70 एकरच्या भव्य परिसरात हे राम मंदिर उभारले जात आहे. या मंदिराचे बांधकाम मे 2022 पासून सुरू झाले आहे. गुलाबी वाळूचा दगड राजस्थानच्या बन्सी पहारपूरचा येथील आहे. मंदिराचे गर्भगृह पांढरा संगमरवरी दगडापासून तयार केला आहे.
एकत्रित मुर्तीला सात महिने लागतील
चंपत राय यांनी जानकी, तीन भाऊ आणि हनुमानाची एकत्रित मुर्ती तयार होण्यास सात महिने लागतील असे स्पष्ट केले. पुढील 7 - 8 महिन्यांत आणखी 7 मंदिरे बांधली जातील. ज्यात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, शबरी आणि अहिल्या मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय आवारात जटायूची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
अयोध्येत दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांसाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकावेळी 25 हजार यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर, पाणी, स्वच्छतागृहे, रुग्णालयाची व्यवस्था उभारण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास भाविकांनी न येण्याचे आवाहन केले आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास होणाऱ्या गर्दीचा अंदाज बांधला जात आहे. या सोहळ्याच्या प्रत्रिकांचे वाटप अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्याला देशभरातील संत - महंत यांच्याबरोबर देशातील बडे उद्योजक, राजकारणी यांची देखील उपस्थिती राहणार आहे.
(Edited by Amol Sutar)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.