BJP's Action in Sangli : सांगलीत भाजपची कडक कारवाई... माजी आमदारासह माजी जि. प सभापतींची हकालपट्टी

Ex MLA Vilasrao Jagtap Tammangouda And Ravi Patil News : सांगतील भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी अनेकांना धक्का देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये माजी आमदारासह माजी जि. प सभापतींची हकालपट्टी करण्यात आली आहे.
BJP Politics
BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्त्या केल्या झाल्यानंतर भाजप आता अॅक्टीव्ह मोडवर आली आहे. भाजपने सांगलीत मोठी कारवाई करत लोकसभा, विधानसभेत पक्षाविरोध भूमीका घेणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केलं आहे. याचा पहिलाच फटका माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह माजी जि.प. सभापती तम्मनगौडा रविपाटील यांना बसला आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्षाला तर विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठींबा दिल्याच्या कारणावरून भाजपने या दोघांची हकालपट्टी केली आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला म्हणावे तसे यश आले नाही. तेव्हा स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीचे राजकारण करत अपक्षाला पाठिंबा दिला होता. यामुळे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार विशाल पाटील विजयी झाले होते. तर जत विधानसभा मतदार संघात बंडखोरी माजी जि.प. सभापती तम्मनगौडा रविपाटील यांनी बंडखोरी करत भाजपला चेतावणी दिली होती. यानंतर आता माजी आमदारांसह माजी जि.प. सभापतींवर कारवाईचा बडगा भाजपने उगारला आहे.

लोकसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. अपक्ष विशाल पाटील यांना उघड पाठींबा देत भाजपशी फारकत घेतली होती. मात्र विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी पुन्हा पक्षातील प्रमुख इच्छुकांना सोबत घेऊन जतमध्ये नव्याने मांडणी सुरु केली होती.

तर गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात मोठ बांधताना ते उपरे असून त्यांना उमेदवार न देता जत तालुक्यातील भूमिपुत्राला संधी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे लावून धरली होती. मात्र लोकसभेवेळी त्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांची मागणी भाजपने फेटाळली. तर पडळकर यांना मैदानात उतरवले. यावेळी जगताप समर्थक रविपाटील यांनी बंडखोरी करत पडळकर यांना आव्हान निर्माण केले होते. पण विधानसभेत पडळकर भारी पडले आणि ते विजयी झाले.

यानंतरच जगताप आणि रविपाटील यांच्यावरील कारवाईच्या चर्चांना उत आला होता. आता पक्षाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दोन्ही नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई केल्याचे पत्र जाहीर केले आहेत.

BJP Politics
Nagpur BJP and Congress News : भाजपला सोडून काँग्रेसमध्ये गेलेला नागपूरमधील 'हा' नेता अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

तर पक्षविरोध भूमीका भूमीका घेतल्यानेच माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिला असतानाही तो न स्विकारता थेट हकालपट्टी केल्याने परतीचे त्यांचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. यामागे भाजपमधील पडळकर यांचा वाढलेला प्रभाव असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यामुळे आता हकालपट्टीवर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे जत पट्ट्याचे लक्ष लागले आहे.

आधीच राजीनामा दिलाय, मग कसली...?

माजी आमदार विलासराव जगताप यांनी, ‘सहा महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेश कार्यालयाकडे दिला होता. आता पक्षाला जाग आली काय? असा सवाल करताना, राजीनामा दिला असतानाही हकालपट्टीवर करणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

BJP Politics
Nitish Kumar And BJP : नितीश कुमारांचा काही तासांतच 'यू टर्न' की...? मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढणाऱ्या प्रदेशाध्यक्षांवर मोठी कारवाई

आदेश कशासाठी ?

तसेच पक्षाने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करताच मी स्वतः 27 ऑक्टोबरला पक्ष सोडला आहे. अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलो. मग आता कसली कारवाई भाजप करत असल्याचे सवाल माजी जिल्हा परिषद सभापती तम्मनगौडा रविपाटील यांनी केला आहे. मी पक्षातच नाही, मग कारवाई करण्याचे कारण काय? असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com