Akola mayor election: अकोल्याच्या राजकारणात भाजपचा सर्जिकल स्ट्राईक! प्रस्थापितांना धक्का देत युवा चेहरा मैदानात; 'या' नावामुळे विरोधक गारद!

Political News : भाजपने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करीत विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Akola News : अकोला महापालिका निवडणुकीत भाजप मोठा पक्ष झाला आहे. सत्ता सथापन करण्यासाठी त्यांना तीन नगरसेवकाची गरज होती. मात्र, दुसरीकडे काँग्रेस, वंचित आघाडी, उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेने छोट्या पक्षांना सोबत घेत भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, भाजपने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करीत विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात आल्याने, आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यासोबतच महापौर पदासाठी प्रस्थापितांना धक्का देत युवा चेहरा मैदानात उतरवत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे.

अकोला महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना सत्तेसाठी केवळ 3 जागांची गरज आहे. मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने भाजपने 41 चा आकडा पार केला आहे. भाजपने 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करीत बहुमताचा आकडा पार केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी मारली असून 13 वरून 21 जागांवर झेप घेतली आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरेंची शिवसेना 6, वंचित बहुजन आघाडी 5, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 3, एमआयएम 3, अपक्ष 3 असे एकत्र येत भाजपसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र, भाजपने त्यामध्ये आघाडी घेत बहुमताचा एकदा पार केला आहे.

BJP Flag
BJP Mayor : काँग्रेसच्या हातातून महापालिका गेली, भाजपने सत्तागणित जुळवले; प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!

अकोला महापालिकेत आता महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अकोला महापालिकेतील महापौरपद हे यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपकडून ‘युवा कार्ड’ खेळले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गटनेतेपदावर युवा नेतृत्वाला संधी दिल्यानंतर भाजप आता महापौरपदासाठीही तरुण चेहरा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

BJP Flag
NCP SP Leader : पवारांच्या नेत्याचा मोठा दावा; ‘ज्यांनी ज्यांनी माझा पराभव केला, ते पुढे आमदार झाले’

भाजपने गटनेतेपदी भाजयुमोचे अकोला महानगराध्यक्ष आणि युवा चेहरा पवन महल्ले यांची निवड केली आहे. गटनेतेपदासाठी तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर, महापौरपदासाठीही त्याच धर्तीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भाजपकडून नितू जगताप या महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेविकेचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.

BJP Flag
Congress Mayor : काँग्रेस नेत्यांमधील भांडण मिटले, महापालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा! भाजपचे 'ऑपरेशन लोटस' अ‍ॅक्टिव्ह?

प्रभाग क्रमांक 3 मधून नितू जगताप या पहिल्यांदाच भाजपकडून निवडून आल्या असून, त्या केवळ 25 वर्षांच्या आहेत. त्या शिक्षण आणि व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असून, त्यांच्या तरुण वयामुळे आणि ओबीसी महिला प्रवर्गातील स्थानामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. भाजपकडे सध्या ओबीसी प्रवर्गातील 16 महिला नगरसेविका आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी भाजपमध्ये 40 टक्के तरुणांना तिकीट आणि पदे दिली जातील, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात गटनेतेपदानंतर आता महापौरपदावरही तरुण नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP Flag
BJP Vs Shivsena : भाजपने डाव अजूनही सोडलेला नाही : ऐनवेळी दगा देणाऱ्या शिंदेंविरोधात रवींद्र चव्हाण मोठ्या खेळीच्या तयारीत

भाजपकडून नितू जगताप पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांचे वडील महादेव उर्फ बबलू जगताप हे वंचित बहुजन आघाडीकडून सलग दोन वेळा अकोला महापालिकेत नगरसेवक झाले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी बबलू जगताप यांनी वंचितमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Flag
NCP SP Leader : पवारांच्या नेत्याचा मोठा दावा; ‘ज्यांनी ज्यांनी माझा पराभव केला, ते पुढे आमदार झाले’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com