Sanjay Rathod News : आता बंजारा समाज आंदोलनाच्या तयारीत! हैदराबाद गॅझेटनूसारच 'एसटी'मधून आरक्षणाची मागणी!

The Banjara community gears up for a protest, demanding ST reservation : मंत्री संजय राठोड यांनी मुंबईत आज महत्वाची बैठक बोलावली आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू, महंत आणि महत्वाचे नेते, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai News
Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला यश मिळाले. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटीअर लागू करण्याचा निर्णय घेत तसा जीआर देखील काढला. त्यानूसार मराठा समाजाला कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यानंतर आता बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे, त्यासाठी हैदराबाद गॅझेटीअरचाच आधार आणि त्यातील नोंदीनूसार एनटी (ए) ऐवजी अनुसूचित जमाती (एसटी)चे आरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या मागणीची निवेदनं मोठ्या प्रमाणात सरकारकडे पाठवली जात आहेत. याच मागणीवर विचारमंथन करण्यासाठी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मुंबईत आज महत्वाची बैठक बोलावली आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू, महंत आणि महत्वाचे नेते, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतरच बंजारा समाजाला कोणते आरक्षण लागू करावे, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, बंजारा समाजाने केलेल्या मागणीला पाठिंबा वाढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बंजारा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे केवळ मराठा (Maratha Reservation) समाजालाच नाही तर बंजारा समाजालाही फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंजारा समाज हा सध्या एनटी (ए) प्रवर्गात आहे. मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात होण्याची शक्यता आहे. मुंबईत बंजारा समाजाच्या एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला बंजारा समाजाचे सर्व धर्मगुरू, महंत, मंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि बंजारा समाजातील अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.

Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai News
Maratha Reservation : जरांगेंना बळ मिळणार, आता कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री; मराठा व कुणबीबाबत महत्वाचा उल्लेख...

या बदलावर समाजात मतांतरे असल्याने समाजाची बाजू समजून घेण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी (ए) मध्ये आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाज हा एसटीमध्ये जाईल. बंजारा समाजाची आधीपासून मागणी होती की, त्यांना एसटीमधून आरक्षण मिळावे. ही मागणी प्रलंबित होती. हैदराबाद गॅजेटचा फायदा जसा मराठा समाजाला होईल तसा बंजारा समाजाला सुद्धा होईल, असा दावा केला जात आहे.

Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai News
OBC Reservation : ओबीसी महासंघानेही उधळला गुलाल; फडणवीसांचा निरोप घेऊन आलेले मंत्री ठरले संकटमोचक

बंजारा समाजावर अन्याय का?

जर 'हैद्राबाद गॅझेटीयर'च्या आधारावर मराठा समाजाला 'कुणबी प्रमाणपत्र' मिळत असेल तर त्याच गॅझेटीयरमध्ये 'आदिवासी' उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का?, असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित केला जात आहे. या मागणीसाीठी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी बंजारा समाजाकडून सुरू आहे. आजच्या मुंबईच्या बैठकीत या संदर्भात निर्णय होऊ शकतो. तत्कालीन निजाम सरकारच्या 'हैद्राबाद गॅझेटीयर'मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे. सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला 'विमुक्त भटक्या जमाती' एनटी प्रवर्गाचे आरक्षण मिळते.

Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai News
सरकारसमोर नवे संकट! हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय महायुतीच्याच अंगलट येणार? ओबीसीबरोबरच आता आणखी एक समाज रस्त्यावर उतरणार

देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाजही 'हैद्राबाद गॅझेटीयर'चा आधार घेत महाराष्ट्रात आरक्षणाचं आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहे.

Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai News
Sanjay Rathod News : शिंदेंचा आणखी एक लाडका 'संजय' अडचणीत; मंत्री राठोड यांना CM फडणवीस यांचा दणका

हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून बंजारा समाजाने केली आहे. या मागणीला गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवीत ही मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे जाहीर केले. सध्या बंजारा समाज व्हीजेएनटी (ए) प्रवर्गात आहे. बीडच्या गेवराई येथे बंजारा समाजाची बैठक पार पडली आणि याच बैठकीतून बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली जाते आहे. वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील बैठकीतून देण्यात आला.

Sanjay Rathod Meeting With Banjara Community In Mumbai News
Maratha Reservation News : हैदराबाद गॅझेट हा मराठ्यांचा कुणबी प्रवर्गात समावेश होण्यासाठीचा मोठा पुरावा!

दरम्यान, बंजारा समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा, अन्यथा हायकोर्टात जाण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. बंजारा समाजाला देखील हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करावे, अशी मागणी समाजाच्यावतीने नांदेडमध्ये करण्यात आली आहे. नांदेडच्या देगलूरच्या तहसीलदारांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देत ही मागणी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com