Ajit Pawar: अजितदादांच्या अडचणी वाढणार; धनंजय मुंडेंनंतर आणखी एका शिलेदारावर टांगती तलवार

NCP leader controversy News : महायुतीच्या सरकारने शपथ घेतल्यापासून या-ना त्या कारणाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढील अडचणी वाढतच आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार येऊन दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला असला तरी दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागील शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनवाल्याने अडचणीत भरच पडली आहे.

महायुतीच्या सरकारने शपथ घेतल्यापासून या-ना त्या कारणाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढील अडचणी वाढतच आहेत. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी अजितदादांनी गेल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम व संजय बनसोडे या दिगग्ज मंत्र्यांना वगळून हाती नारळ दिले होते. वगळण्यात आल्याने या मंत्र्याची नाराजी होती. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मात्र नाराजी व्यक्त करीत अजितदादांचे नाव न घेता टार्गेट केले होते. एवढयावर न थांबता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला दांडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची तयारी देखील सुरु केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आता कुठे या वादावर पडदा पडला आहे.

Ajit Pawar
Dharashiv Shivsena : धाराशिवमध्ये पाऊल ठेवताच पालकमंत्री सरनाईकांचे मोठे विधान; म्हणाले, 'दोनवेळा जाळ्यात अडकलेला वाघ..'

बीड जिल्ह्यातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करू नये, अशी मागणी जोर धरत होती. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष करीत धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला होता. मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच आहेत.

Ajit Pawar
Shivsena Politics : गद्दारी, कोणासोबत? वैभव नाईकांनी घेतली शिवजयंतीला शपथ...

मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपाची राळच उठवली आहे. या मंडळींकडून दररोज नवनवीन प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी कोर्टात धाव घेत त्यांच्या विरोधात खंबीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

Ajit Pawar
Ladki Bahini Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर होणार उद्यापासून 1500 रुपये जमा; अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

दुसरीकडे गुरुवारी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना, 1995 सालच्या एका प्रकरणात दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.

Ajit Pawar
Delhi BJP Strategy : दिल्लीत राजस्थानप्रमाणे भाजपचे धक्कातंत्र; आणखी दोन वेगळ्या पॅटर्नची चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेवेळी मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे आश्वासन सिन्नरकरांना दिले होते. अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळत माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी सोपवली. माणिकराव कोकाटेंचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे. यंदा पहिल्यांदाच त्यांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली. त्यातच आता कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकि‍र्दीला ब्रेक लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Ajit Pawar
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या दोन महिन्यापासून केली जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता माणिकराव कोकाटे यांना कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोपावरून दोन वर्षाची शिक्षा सुनावली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत भरच पडली आहे. गेल्या काही दिवसापासून विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या या आरोपामुळे महायुती सरकार चांगलेच बॅकफूटवर गेले आहे.

Ajit Pawar
Delhi CM BJP Decision : दिल्ली मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com