Nanded municipal election : देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींच पावर हाऊस; महाराष्ट्राच इंजिन देवाभाऊ अन् नांदेडच छोटंस इंजिन अशोक चव्हाण!

BJP rally Nanded News : तीन इंजिनने डबे खेचले तर नांदेडची गाडी वेगाने पुढे जाईल की नाही? अशा शब्दांत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना आवाहन केले.
Ashok Chavan, devendra Fadanvis
Ashok Chavan, devendra Fadanvis Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Wagahala Municipal Corporation : अशोक चव्हाणांचे राजकारण हे लाटेवर आलेले नाही, तर 73 वर्षांच्या समाजकारणातून आले आहे. नांदेड हे फक्त माझे घर किंवा मतदारसंघ नाही, तर नांदेड माझी आस्था, अस्मिता आणि अभिमान आहे. या नांदेडला वेगाने पुढे न्यायचे असेल तर देशाचे मोठे इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींच पावर हाऊस, महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ आणि नांदेडच छोटंस इंजिन अशोक चव्हाण आहे. मग या तीन इंजिनने डबे खेचले तर नांदेडची गाडी वेगाने पुढे जाईल की नाही? अशा शब्दांत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना आवाहन केले.

नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग सोमवारी फुंकण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आणि विरोधकांना आव्हान दिले. विरोधकांकडे उमेदवार नाही, माणसं नाहीत. उत्तरमध्ये आघाडी आहे, तर दक्षिणमध्ये नाही हा काय प्रकार आहे? असा नियोजनशून्य लोकांच्या हातात नांदेड देणार का? याचा विचार तुम्ही केला पाहिजे.

Ashok Chavan, devendra Fadanvis
Congress News : प्रणिती शिंदेंनी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघावर काँग्रेसचा पुन्हा डोळा; सर्वाधिक 22 उमेदवार उतरविले रिंगणात

1952 मध्ये शंकरराव चव्हाण या शहराचे नगराध्यक्ष झाले. तेव्हापासून आमचं कुटुंब नांदेडकरांची सेवा करत आहे. आम्ही नुसतं भाषणं करत नाहीत, केलीली कामं तुम्हाला दिसत आहेत. नांदेडला कायम झुकंत माप देण्याचं काम मी केलं. आमदार, खासदार, मुख्यमंत्री असताना आणि आता भाजपचा (BJP) खासदार म्हणूनही विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड हेच आमचे उदिष्ट असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan, devendra Fadanvis
ShivSena Bhavan : राज ठाकरेंनी जागवल्या सेनाभवनातील जुन्या आठवणी; 'ठाकरी' शैलीत जुन्या संघर्षाचा वाचला पाढा !

नांदेडकरांचा विश्वास अशोक चव्हाणवर (Ashok Chavan) आहे. आत्मविश्वास, प्रामाणिकता, विश्वासहर्ता आमच्याकडे आहे. विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत अन् तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता, असा टोलाही चव्हाण यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

Ashok Chavan, devendra Fadanvis
NCP Pune : पुण्यात शरद पवारांनी शोधली प्रशांत जगतापांची रिप्लेसमेंट : ऐन महापालिका निवडणुकीदरम्यानच शहराध्यक्षांची नियुक्ती

नांदेड माझ फक्त घर नाही, मतदारसंघ नाही, तर माझी आस्था, अस्मिता आणि अभिमान आहे. लोकांना शिव्या शाप देणं हा काही अजेंडा होऊ शकत नाही. एखाद्या लाटेत सुरू झालेलं आपलं राजकारण नाही. समाजकारणातून आपलं राजकारण सुरू झालं आहे. ७३ वर्षापासून विकासाचे राजकारण सुरू आहे, आमचे कुटुंब सेवा करत आहे, याचा उल्लेख करतानाच विरोधकांना आमच्या एकजुटीची दिवार तुटत का नाही? असा प्रश्न पडला आहे. पण हा मजबुत जोड आहे, यात भाजपचं सिमेंट आहे, त्यामुळे ही दिवार कधीच तुटणार नाही? असा खोचक टोला अशोक चव्हाणांनी आपल्या विरोधकांना लगावला.

Ashok Chavan, devendra Fadanvis
Shivsen Vs MNS : सेटलमेंट कोण कोणाशी करतंय, हे जनतेला माहिती आहे; सुनील प्रभूंचा राज ठाकरेंवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com