Eknath Shinde : ठाकरेंच्या निरोप समारंभात एकनाथ शिंदे केवळ दोनच वाक्य बोलले; 'उद्धवसाहेब' असा उल्लेख करत म्हणाले...

Eknath Shinde Speech for Uddhav Thackeray Farewell : देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या निरोपाच्या भाषणात बोलताना,"पु.ल. देशपांडे यांची ओळख 'कोट्या'धीश अशी होती. पुलंनंतर मी उद्धव ठाकरे यांना 'कोट्या'धीश म्हणेन," असं म्हणत ठाकरे या सभागृहात पुन्हा आले तर अधिक कोट्या ऐकायला मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Mar : राजकीय आणि वैचारिक मतभेद कितीही टोकाचे असले तरीही समोरच्याविषयी मनामध्ये वैयक्तिक द्वेष न ठेवणे हीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती आहे. याच संस्कृतीचे दर्शन मंगळवारी विधानपरिषदेत झालं.

निमित्त होतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील नऊ सदस्यांना निरोप देण्याचं. या निरोपाच्या भाषणात सभागृहात राजकीय कोपरखळ्या आणि शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली. शिवाय यावेळी अनेकजण भावूक देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या निरोपाच्या भाषणात बोलताना,"पु.ल. देशपांडे यांची ओळख 'कोट्या'धीश अशी होती. पुलंनंतर मी उद्धव ठाकरे यांना 'कोट्या'धीश म्हणेन," असं म्हणत ठाकरे या सभागृहात पुन्हा आले तर अधिक कोट्या ऐकायला मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Gopichand Padalkar News: जयंत पाटलांचं 'खरात कनेक्शन' समोर येताच सांगलीतला पराभव जिव्हारी लागलेले पडळकर झाले 'अ‍ॅक्टिव्ह'; म्हणाले...

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना निरोप दिला आणि राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा देखील दिल्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून एकमेकांकडे न बघणारे हे नेते आपलं वैर विसरून सभागृहात मनमोकळेपणाने बोलताना पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख साहेब असा केला. विधानपरिषदेमधील भाषणादरम्यान, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचं पहिल्यांदा नाव घेत बोलायला सुरूवात केली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा."

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Mamata Banerjee Resigns : विधानसभा निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिला 23 पदांचा राजीनामा

मात्र, एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित नव्हते. तर निरोप समारंभाला चांगलं बोलायचं असत. काहीजण सभागृहात पुन्हा भेटतील, काही जण फिल्डवर काम करताना भेटतील, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर या विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com