

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत असतानाच. रविवारी जिल्हा न्यायालयाने अशोक खरात याला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी तपासात सहकार्य करत नाही, त्यामुळे चौकशीसाठी अधिक वेळ आवश्यक आहे. यावर न्यायालयाने सहमती दर्शवत त्याला 1 एप्रिलपर्यंत कोठडी दिली.
या प्रकरणात एसआयटीकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलांचे शोषण करण्यासाठी आरोपी विशेष प्रकारचा खारट किंवा कडवट चवीचा द्रवाचा आणि विशिष्ट पेढ्यांचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा द्रव पिल्यानंतर आणि पेढा खाल्ल्यानंतर महिलांची मानसिक व शारीरिक अवस्था बदलत होती. अनेक पीडित महिलांनी मळमळ, चक्कर येणे, अंग जड होणे अशा तक्रारी सांगितल्या आहेत.
या अवस्थेचा फायदा घेत आरोपी महिलांना आपल्या ताब्यात घेत असे. त्यानंतर केबिनमधील दिवे बंद करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या द्रवात नेमके कोणते पदार्थ मिसळले होते आणि पेढ्यात कोणते घटक वापरण्यात आले होते, याचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपीकडून याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे अधिक वेळ मागितला होता, जो मंजूर करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.