Navi Mumbai Scam: महाराष्ट्र पुन्हा हादरला; 40 महिलांचे लैंगिक शोषण; आरोपीची मोडस ऑपरेंडी पाहून बसेल धक्का, तुम्हीही सावध राहा...

Adarsh Mhatre arrested in Navi Mumbai matrimonial scam: महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकरणात 40 महिलांचे शोषण उघड झाले. आरोपीची फसवणुकीची पद्धत जाणून घ्या.
Adarsh Mhatre arrested in Navi Mumbai matrimonial scam
Adarsh Mhatre arrested in Navi Mumbai matrimonial scamSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai 40 women exploitation case details: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हादरवणारे प्रकरण समोर आले असून नवी मुंबईत एका भामट्याने तब्बल 40 महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर हे दुसरे मोठे प्रकरण असल्याने राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आदर्श म्हात्रे (वय 35) असे या आरोपीचे नाव असून तो स्वतःला कधी इस्त्रोचा शास्त्रज्ञ तर कधी आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून महिलांना जाळ्यात ओढत होता.

आदर्शची काम करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. तो मॅट्रिमोनी संकेतस्थळांवरून अशा महिलांचा शोध घ्यायचा ज्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि वर्षाला 25 ते 35 लाख रुपये कमावणाऱ्या महिलांवर तो लक्ष केंद्रित करायचा. स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी तो आलिशान गाड्यांचा वापर करायचा आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटी आयोजित करून विश्वास संपादन करायचा.

महिला त्याच्यावर विश्वास ठेवू लागल्यानंतर तो प्रेमाचे नाटक करत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. त्यानंतर भावनिक दबाव टाकून त्यांच्या नावावर 35 ते 40 लाख रुपयांचे कर्ज काढायला लावायचा. मिळालेली रक्कम तो आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर वळवून स्वतः मात्र मौजमजा करण्यासाठी गोव्यासारख्या ठिकाणी पळून जायचा. फसवणूक पूर्ण होताच तो मोबाईल नंबर बंद करून संपर्क तोडायचा.

Adarsh Mhatre arrested in Navi Mumbai matrimonial scam
Trupti Desai on Nilam Gorhe : 'चाकणकरांनंतर आता नीलम गोऱ्हेंचा नंबर?' तृप्ती देसाईंचा मोठा गौप्यस्फोट! 'त्या' भेटींची SIT चौकशी होणार?

या प्रकरणात आतापर्यंत 40 गुन्हे दाखल झाले असून अजून सुमारे 50 महिलांनी सामाजिक बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपीचे गुन्हे नवी मुंबईपुरते मर्यादित नसून ठाणे, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक तसेच कर्नाटकातही त्याचा पसारा असल्याचे समोर आले आहे.

Adarsh Mhatre arrested in Navi Mumbai matrimonial scam
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत मोठी वाढ; आता समोर आलं 'रायगड कनेक्शन', नेमकं प्रकरण काय?

तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली असून आरोपी विविध बनावट नावांनी वावरत होता. स्वप्नील वारूळ, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे आणि तन्मय म्हात्रे अशी त्याची अनेक ओळखी होत्या.

या घटनेमुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तींची खातरजमा केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com