Kolhapur News: 70 कोटींच्या वसुलीसाठी थेट कोल्हापूरचा पाणीपुरवठाच तोडला, संतापलेल्या पालिकेने विखे पाटलांच्या 'जलसंपदा'ला ठोकलं टाळं

Kolhapur Water Controversy : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बालिंगा आणि नागदेवाडी येथे उपसा केंद्र आहे. पंचगंगा नदीतून हे पाणी उपसा केले जाते. 2011 पासून कोल्हापूर महानगरपालिकेने जलसिंचन विभागाचे पाणी बिल थकवले आहे. जवळपास हे पाणी बिल 70 कोटीच्या घरात आहे.
Kolhapur Mahapalika Radhakrishna Vikhe Patil.jpg
Kolhapur Mahapalika Radhakrishna Vikhe Patil.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: येत्या 31 मार्चला 2025 ते 2026 हे आर्थिक वर्ष संपत आहे. अशातच सर्व प्रशासकीय विभागातून वसुली सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील मंत्र्यांनी वसुली मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील थकीत पाणी बिल आकारणीचे आदेश सर्व जिल्ह्यातील विभागांना देण्यात आले आहेत.

त्यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापूर जलसिंचन विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत असलेला सत्तर कोटीच्या वसुलीसाठी शहराचा पाणीपुरवठा तोडला. मात्र त्याला उत्तर म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेने थेट जलसिंचन विभागच सील केले.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बालिंगा आणि नागदेवाडी येथे उपसा केंद्र आहे. पंचगंगा नदीतून हे पाणी उपसा केले जाते. 2011 पासून कोल्हापूर महानगरपालिकेने जलसिंचन विभागाचे पाणी बिल थकवले आहे. जवळपास हे पाणी बिल 70 कोटीच्या घरात आहे.

निव्वळ पाणी बिल हे 66 कोटी असून त्यावरील सेस कर हा चार कोटीचा आहे. वारंवार पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करून देखील कोल्हापूर महानगरपालिका थकीत पाणी बिल भरत नसल्यामुळे आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट नागदेवाडी येथे उपसा केंद्र बंद करत शहराचा पाणीपुरवठा खंडित केला.

Kolhapur Mahapalika Radhakrishna Vikhe Patil.jpg
Ashok Kharat Case: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; 58 महिलांची लाज विकणाऱ्या 'मास्टर माईंड'ला पोलिसांनी केली अटक

मागील काही दिवसांमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती. या बैठकीत महानगरपालिकेने दहा कोटी पाणी बिल तत्काळ भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ते पाणी बिल देखील अद्याप पाटबंधारे विभागाकडे भरण्यात आले नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता.20 मार्च) सायंकाळी चारनंतर महापौर निकम यांच्या समवेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत जलसिंचन विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत असलेला सत्तर कोटीच्या वसुलीसाठी शहराचा पाणीपुरवठा तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com