VBA On Ashok Kharat : अशोक खरातच्या जीवाला धोका! कोठडीतच..., 'वंचित'ने व्यक्त केली वेगळीच भीती

Ashok Kharat Case : अशोक खरात याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे
VBA raises concern over alleged threat to Ashok Kharat’s life, demands security measures.
VBA raises concern over alleged threat to Ashok Kharat’s life, demands security measures. sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat News : अशोक खरात प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसआयटीकडून या प्रकरणाची तपास सुरू असून खरातच्या ऑफीस बाॅयमुळे हे प्रकरण समोर आले. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने वेगळीच भीती व्यक्त केली आहे.

'वंचित'ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आतापर्यंत समोर आलेली माहिती ही “हिमनगाचे टोक” असून, या प्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. काही मंत्री, त्यांचे कुटुंबीय, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे.

अशोक खरात हा केवळ आरोपी नसून या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार देखील आहे. त्यामुळे त्याच्याकडून महत्त्वाची नावे समोर येऊ नयेत यासाठी त्याला कोठडीतच जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती 'वंचित'ने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर अशोक खरात याला तात्काळ उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

VBA raises concern over alleged threat to Ashok Kharat’s life, demands security measures.
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? पोलिस आयुक्त काय म्हणाले?

100 पेक्षा अधिक तक्रारी

एसआयटीच्या हेल्पलाईन नंबरवर अशोक खरात विरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. यातील 70 टक्के तक्रारी या महिलांच्या आहेत. हेल्पलाईनवर फोन करून तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष लेखी तक्रार देण्यात तक्रार उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एसआयटीकडून तक्रारांना विश्वासात घेतले जात असल्याची माहिती आहे.

VBA raises concern over alleged threat to Ashok Kharat’s life, demands security measures.
Ashok Kharat Case: खरातची आता खैर नाही! ज्यानं धाडसानं हे प्रकरण समोर आणलं त्या पत्रकाराकडून उद्या...; घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com