Sharad Pawar : मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात? शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'माझाही पक्ष...'

Assembly Election 2024 Sharad Pawar manoj Jarange Patil : मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची भूमिका ही सहकार्याची राहिल. या बैठकीत मराठा आंदोलकांसह ओबीसी आंदोलकांनी देखील बोलवावे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar manoj Jarange Patil
Sharad Pawar manoj Jarange Patil sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील शांतता रॅली काढून सरकारला इशारा देत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. जर, आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला 288 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जरांगे पाटील सांगत आहेत.

निवडणूक लढण्या विषयीचा निर्णय 29 ऑगस्टला मनोज जरांगे घेणार आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी निवडणूक लढावावी की नाही? यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील सातत्याने 288 उमेदवार उभे करण्या विषयी बोलत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, 'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. निर्णय घेण्याचा, लोक उभे करण्याचा, उभे करतील त्यांना पाठींबा देण्याचा, विरोध करण्याचा. त्यात काय चुकीचे आहे?. माझाही पक्ष निवडणूक काही जागा लढणार आहे .'

Sharad Pawar manoj Jarange Patil
Video Sharad Pawar : 'स्थिर सरकारसाठी जास्तीत जास्त सभा घ्या', शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

मराठा आरक्षणावर तोडगा काय?

मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची भूमिका ही सहकार्याची राहिल. या बैठकीत मराठा आंदोलकांसह ओबीसी आंदोलकांनी देखील बोलवावे आणि आरक्षणावर यातून मार्ग काढावा, असे शरद पवार म्हणाले.

राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मणिपूर सारखी दंगल महाराष्ट्रात होण्यात शरद पवारांनी हातभार लावू नये, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर ' कारण नसताना त्यांनी माझे नाव दोन तीन वेळा का घेतलं हे माहीत नाही. पण मी या रस्त्याने कधी जात नाही. मी देखील मराठवाड्यात येतो. मलाही लोकांनी अडवलं. मलाही लोकांनी निवेदन दिलं. मग हेही पवार यांनीच केलं का? मला आडवा असं मी म्हटलं का?, असा टोला पवारांनी राज ठाकरेंना लगावला.-

Sharad Pawar manoj Jarange Patil
Harshvardhan Patil : 10 वर्षे अडवलं, आणखी दोन महिने अडवतील, नंतर..! हर्षवर्धन पाटलांचं सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com