Harshvardhan Patil : 10 वर्षे अडवलं, आणखी दोन महिने अडवतील, नंतर..! हर्षवर्धन पाटलांचं सूचक विधान

Indapur Vidhan Sabha : महायुतीतून आमदार भरणे यांची उमेदवारी फिक्स होण्याची शक्यता मानली जात आहे. त्यामुळेच पाटील यांनी पुन्हा एकदा अपक्ष लढण्याची तयारी सुरू केलेली आहे.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : इंदापूरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी लोकसभेपूर्वीपासूनच केलेली आहे. येथून मात्र अजित पवार गटाचे दत्तात्रेय भरणे आमदार असल्याने महायुतीत त्यांचीच उमेदवारी फिक्स मानली जात आहे. पाटील यांनीही मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केलेली आहे.

निरवांगी येथे गावभेटीदरम्यान पाटील यांनी, राजकारणातून विकासकामे करताना आपल्याला दहा वर्षे अडवले आहे. आता दोन महिने अडवतील. त्यानंतर आपणच आहोत, असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे यंदा आमदार भरणे यांच्यापुढे हर्षवर्धन पाटील यांच पुन्हा एकदा आव्हान असणार आहे.

लोकसभेत महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांना इंदापूरातून 25 हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. आमदार भरणे आणि माजी मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांनंतरही महायुतीच्या उमेदवाराला येथून मताधिक्य देता आलेले नाही. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरातील वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतून आमदार भरणे Dattatray Bharne यांची उमेदवारी फिक्स होण्याची शक्यता मानली जात आहे. त्यामुळेच पाटील यांनी पुन्हा एकदा अपक्ष लढण्याची तयारी सुरू केलेली आहे.

सध्या पाटील Harshvardhan Patil इंदापूरातील गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधत आहे. निरवांगी येथे त्यांनी बोलताना केलेल्या विकासकामांचे यादी सांगितली. तसेच गेल्या दहा वर्षांत काय झाले, याचा पाढाही वाचला. ते म्हणाले, गेल्या वर्षी दर्शनाला आलो असता येथील मंदिराच्या शिखराला चिरा पडल्याचे दिसले. त्यासाठी 15 लाखांचा निधी मंजूर केले. तसे ग्रामपंचायतीला पत्रही आले. मी माझे काम केले होते. दुर्दैवाने राजकारणातून हे काम घाटासाठी वळते केले.

Harshvardhan Patil
Sharad Pawar : मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार? शरद पवारांनी सुचवला मार्ग

आता पुन्हा एकदा सांगतो की योजनेतून या मंदिरासाठी 15 लाखांचा निधी आणण्याची माजी जबाबदारी आहे. जर या कामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न होण्याचीही शक्यता आहे. त्यांनी गेले दहा वर्षे अडवलेच आहे. आणखी किती अडवतील. दोन, तीन महिने अडवतील. तसेच मी शब्द दिल्यामुळे आता हे काम पूर्ण करण्याची माझीच जबाबदारी जास्त असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Harshvardhan Patil
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री सावंतांनी फुंकले रणशिंग, मात्र तोंड गोड ठेवण्याचे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com