MLC Election : 'आमदरकी'साठी बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश, 'प्रहार'बाबत घेतला मोठा निर्णय

Bacchu Kadu Shivsena : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी मोठ्या घडामोडी घडत असून बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांनी स्वतःच ही माहिती माध्यमांना दिली.
Bacchu Kadu & Eknath Shinde
Bacchu Kadu at the center of political discussions over a possible entry into Shiv Sena during the Legislative Council election season.Sarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu News : विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. 'प्रहार' प्रमुख बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. शिंदेंना भेटण्यापूर्वीच माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मी शेतकरी,मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहे.

बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विधान परिषदेच्या आमदारकीसोबत पुढील सहा महिन्यात त्यांना मंत्रिपद देखील देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, प्रहार संघटनेबाबत बच्चू कडूंनी मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेकडून प्रहार राजकीय संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवण्यात आली होती. याबाबत बोलताना कडू म्हणाले की, प्रहार ही सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. ती कायम राहिली. आणि प्रहारमधील ज्या राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय काम करायचे आहे ते शिवसेनेत येतील.

Bacchu Kadu & Eknath Shinde
MLC Candidate : मध्यरात्री खलबतं, एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला! मंत्रिपदही फिक्स, अख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार!

12 वाजता उमेदवारी जाहीर होणार

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे दुपारी 12 वाजता दोनही उमदेवारांची नावे जाहीर करतील. दरम्यान, बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Bacchu Kadu & Eknath Shinde
Congress MLC Election : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; ठाकरेंचा उमेदवार डेंजर झोनमध्ये?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com