

Congress News : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीत फूट पडली असून काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक सुरू असून बैठकीला जाण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार देणार असल्याचे सांगितले.
काँग्रेसने विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत स्पष्ट केले होते की उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार नाही. मात्र, उद्धव ठाकरेंनी उमेदवारीतून माघार घेत अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे.
काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केली असून शिंदेंच्या शिवसेना देखील आपला तिसरा उमेदवार देण्यबाबत रणनीती आखत आहे. त्यामुळे जर काँग्रेसच्या उमदेवारासोबत शिंदेंनी देखील तिसरा उमेदवार मैदानात उतरवला तर अंबादास दानवे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मते फोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिंदेंना तिसरा उमेदवार उतवण्यासाठी भाजपची साथ मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, शरद पवारांनी आपली भूमिका खूप दिवसापूर्वीच जाहीर करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा देणार असल्याचे सांगितले होते.
विधान परिषद निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षातर्फे AB फाॅर्म दिला गेला असून तो मुंबईत पाठवण्यात आला आहे. दरम्यान आता काँग्रेसकडून विधान परिषदेच्या उमेदवारी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून काही नेत्यांची नावे देखील आता समोर येत आहेत. यामध्ये माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.