Bacchu Kadu News : ...अन्यथा 'महाविकास आघाडी'सोबत चर्चेसाठी तयार; बच्चू कडूंचा सूचक इशारा!

Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंना पाठिंबा देणार असल्याचंही जाहीर केलं.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. तर काही मतदारसंघातील उमेदवार हे निश्चित झाले असून, त्यांनी तसा प्रचारही सुरू केला आहे.

दरम्यान प्रहार संघटनेचे बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी आता आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. जागा वाटपाबाबत आम्हाला अद्याप भाजपकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढच नाहीतर महाविकास आघाडीने आमच्याशी चर्चा केल्यास आम्ही तयार आहोत, असा सूचक इशाराही दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bacchu Kadu
Ramdas Athawale News : 'वकिलांच्या संरक्षणासाठी' आता मंत्री आठवले सरसावले; मुख्यमंत्री-कायदामंत्र्यांना लिहिणार पत्र!

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत(NCP) फूट पडल्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा आणि उत्सुकता असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतही बच्चू कडू यांनी भूमिका जाहीर केली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर, त्यांच्याविरोधात महायुतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र यामध्ये शिवेसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या ठिकाणी होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली.

Bacchu Kadu
Vasant More News : अखेरचा हा तुला दंडवत..! वसंत मोरेंनी 'खळखट्याक'शी नातं तोडलं

महायुतीमधील प्रमुख पक्षांवर नाराजी व्यक्त करत बच्चू कडूंनी, सध्या महायुतीकडून जागावाटपाबाबत आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा झाली नसल्याचं सांगितलं. तसेच, आम्हाला विचारलं गेलं नाहीतर आम्ही मी खासदार ही मोहीम राबवू. महायुती पाळणे हे त्यांचे काम नसेल तर महायुती तोडणे आमचे काम आहे, असा सूचक इशाराही बच्चू कडू यांन यावेळी दिला.

एवढच नाहीतर लहान पक्षांना सापत्न वागणूक देण्याचा भाजपचा इतिहास असल्याचंही बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं. भाजपने(BJP) चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, आम्ही सुद्धा पुढे येऊ. माझा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास आहे. अन्यथा महाविकास आघाडीने आमच्याशी चर्चा केल्यास आम्ही तयार आहोत, असा सूचक इशारा बच्चू कडूंनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com