Narendra Pawar: भाजपच्या माजी आमदाराचा जामीन फेटाळला; 6 पथके घेताहेत नरेंद्र पवारांचा शोध

Bapgaon Rape Case: पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Narendra Pawar court case
Narendra Pawar bail rejectedSarkarnama
Published on
Updated on

भिवंडी: बापगाव-पडघा (तालुका भिवंडी) येथील बहुचर्चित सामूहिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयात मोठा धक्का बसला आहे.

भिवंडीच्या अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे माजी आमदाराच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून, आता सर्वांचे लक्ष आज (२४ सप्टेंबर) होणाऱ्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणीकडे लागले आहे.

Narendra Pawar court case
Vidyanand Bapat: ‘डीजेविरोधी’ विद्यानंद बापट पुणे पदवीधर निवडणूक लढणार? एका पोस्टने चर्चेला उधाण

न्यायालयाचे कडक ताशेरे

अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी नरेंद्र पवार यांच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, प्रकरणातील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कारंडे यांच्या न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळून लावला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा गंभीर गुन्ह्यात तपास यंत्रणा आणि पीडित महिलेची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देता येणार नाही. त्यानुसार न्यायालयाने तपास अधिकारी तसेच पीडित महिलेला गुरुवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकी घटना काय आणि कधी दाखल झाला गुन्हा?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी: कौटुंबिक वादात मध्यस्थी करण्याचे गाजर दाखवून पीडितेला बोलावण्यात आले होते.

अत्याचार: बापगाव येथील फार्महाऊसवर तिला शस्त्राचा धाक दाखवून व मद्यपानाची सक्ती करून दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

Narendra Pawar court case
Mission Mahagram: गावांच्या विकासाला 10 लाखांचा ‘बूस्टर’; कोणत्या गावांना मिळणार निधी? जाणून घ्या निकष

फरार आमदाराच्या शोधासाठी ६ पथके

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांचा साथीदार शैलेश पाटील हे दोघेही पसार झाले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी सहा विशेष पथके तैनात केली आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार यांनी पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते, मात्र ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आज होणाऱ्या सुनावणीत राज्य तपास यंत्रणा आणि पीडित महिला काय भूमिका मांडते, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com