Baramati Bypoll : राहुल गांधींना भेटून, भाजपची नाराजी नको! सुनील तटकरे 'बारामती'साठी मल्लिकार्जुन खरगेंना भेटणार!

NCP Sunil Tatkare plans crucial meeting with Congress president Mallikarjun Kharge to push for an unopposed Baramati by-election : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनील तटकरे यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.
Baramati Bypoll
Baramati BypollSarkarnama
Published on
Updated on

Baramati election news : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मैदानात उतरले आहे. ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. तसा काँग्रेसच्या दिल्ली हायकमांड आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला आहे.

यामुळे अजित पवार राष्ट्रवादी गणित जुळवाजुळवी करण्याची तयारी सुरू केली आहे. यातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु यात देखील तटकरे यांनी सावधानता बाळगली आहे. भाजपचा रोष नको म्हणून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव सुनील तटकरे यांनी टाळल्याची चर्चा आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. अजित पवार यांच्या जागेवर त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणूक लढत आहे. परंतु ही जागा बिनविरोध व्हावी, अशी महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी मागणी लावून धरली आहे.

बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस (Congress) लढणार असल्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या मागणीला काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. यातच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर असल्याची भूमिका घेतली.

Baramati Bypoll
Rahuri Bypoll Crisis : तनपुरेंच्या ‘एकला चलो’ने समीकरणं ढवळली; पवार राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे शिवसेना 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणूक देखील लढणार असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीतून ग्रीन सिग्नल येताच, राहुरी मतदारसंघात अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे संपर्कात नसून, लवकरच इथं काँग्रेसचे उमेदवार निश्चित करू, अशी भूमिका थोरात यांनी माध्यमांसमोर मांडली आहे.

Baramati Bypoll
Rahuri By Election : राहुरीवर मुंबईत मोठं राजकीय मंथन! कर्डिले-मुख्यमंत्री भेटीत विखे-जगतापांची एंट्री

मुंबईत बैठकांचे सत्र सुरू

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका मुंबईत रंगू लागल्या आहेत. यातच धाराशिव दौऱ्यावर असलेले अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, काँग्रेसच्या निवडणूक लढवण्याच्या तयारीवर सावध भूमिका मांडली आहे.

बिनविरोधसाठी खरगेंना भेटणार

सुनील तटकरे म्हणाले, "सुनेत्रा पवार उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरत असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची जागा लढवणार असल्याचं घोषित केलं आहे, त्यावर आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणार आहोत. तसंच सपकाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधत, ही जागा बिनविरोधसाठी पाठिंबा मिळवू."

विमान अपघाताच्या अहवालावर समाधानी नाही

दरम्यान जय पवार यांनी, पत्रकार परिषद घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी, विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत, तत्पूर्वी प्राथमिक अहवाल आला आहे, त्यावर आम्ही समाधानी नाहीत. तपास यंत्रणेने लोकप्रतिनिधीच्या भावना लक्षात घेऊन तपास करावा, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com