Baramati Plane Crash : बारामतीत पुन्हा विमान कोसळले; इमर्जन्सी लँडिग करताना...; 8 महिन्यातील तिसरी घटना!

Baramati aircraft crash News : . बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. आठ महिन्यात तिसऱ्यांदा विमान अपघाताच्या या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Baramati acciden
Baramati accidentSarkarnama
Published on
Updated on

Baramati Airport News : बारामतीत रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा विमान पडल्याची घटना घडली. बारामती विमानतळ परिसरात इमर्जन्सी लँडिग करताना शिकाऊ विमान शेतात कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हे विमान नेमके कशामुळे कोसळले याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. आठ महिन्यात तिसऱ्यांदा विमान अपघाताच्या या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसापासून बारामती परिसरातील विमान अपघाताची मालिका सुरूच आहे. बारामतीजवळ (Baramati Airport) पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळले. एका शेतामध्ये शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या विमान अपघातामध्ये जिवितहानी झाल्याचे किंवा कुणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण या विमान अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बारामती विमानतळावर रविवारी दुपारच्या सुमारास विमान दुर्घटनेची घटना घडली. विमानतळ परिसरात इमर्जन्सी लँडिग (Baramati Plane Crash) करताना शिकाऊ विमान शेतात कोसळले. या शिकाऊ विमान दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समजते. हे शिकाऊ विमान नेमके कशामुळे कोसळले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातानंतर संबंधित तातडीने वेगाने तपासाला सुरुवात केली आहे. या अपघाताच्या कारणांचा तपासही यंत्रणांनी सुरू केला आहे. बारामती विमानतळावर याआधी दुर्घटना घडल्या आहेत.

Baramati acciden
Train Accident : मोठी बातमी : आगीच्या अफवेने धावत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या, दुसऱ्या रेल्वेच्या धडकेत चौघांचा मृत्यू

बारामती परिसरात गेल्या आठ महिन्यात तिसऱ्यांदा विमान अपघाताची घटना घडली. जानेवारी महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे लीयरजेटचे चार्टर विमान कोसळले होते. या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह करण्यात आले.

Baramati acciden
Air India Pilot Test : एअर इंडियाचं विमान पडता पडता वाचल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण; पायलट नशेत असल्याचा अहवाल, 'ती' टेस्ट पॉझिटिव्ह?

त्यानंतर मे महिन्यात पुन्हा विमानाचा अपघात झाला होता. बारामतीच्या गोजुबावी गावाच्या हद्दीत दुसरा विमान अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. शिकाऊ विमान हे इमर्जन्सी लँडिग करताना शेतात कोसळले होते. या दोन घटनानंतर आता रविवारी दुपारी तिसरा विमान अपघात घडला आहे. बारामती विमानतळावर शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com