Video Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का! शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती नाही

Sunil Kedar No suspension of sentence : सहकारी बँकेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात केदार यांना पाच वर्ष कारावासाची आणि साडेबारा लाख दंडाची शिक्षा झाली होती.
Sunil Kedar
Sunil Kedar sarkarnama
Published on
Updated on

Sunil Kedar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात केदार यांना पाच वर्ष कारावासाची आणि साडेबारा लाख दंडाची शिक्षा झाली होती. न्यायालयाने 22 डिसेंबर 2023 रोजी केदार यांना विविध गुन्ह्याअंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.

सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर लोकप्रितिनिधित्व कायद्यानूसार आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही बाजुने युक्तीवाद झाला होता.

केदार Sunil Kedar यांचा मतदारसंघ लोकप्रतिनिधी पासून वंचित आहे, त्यांना नागरिकांच्या अधिकारांसाठी लढता येत नाही, त्यामुळे केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती द्यावी अशी मागणी केदारांच्या वकिलांनी केली होती.

युक्तिवाद 27 जूनला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. तो आज (गुरुवारी) जाहीर करण्यात आला. या निकालात कोर्टाने केदार यांना दिलासा दिला नाही. तसेच शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला.

निवडणूक लढता येणार नाही?

सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर लोकप्रितिनिधित्व कायद्यानूसार अपात्र ठरले आहेत. त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली असती तर त्यांचा निवडणूक Election लढण्याचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र, त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणूक त्यांना लढता येण्याची शक्यता कमी आहे. सुप्रीम कोर्टात जात शिक्षेवर स्थगित आणण्याचा मार्ग अजुनही त्यांच्याकडे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com