BJP Maharashtra : शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची तगडी फिल्डिंग : 25 मतदारसंघांची 'या' दिग्गज नेत्यांवर जबाबदारी

Pune Graduate Election : भाजपने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं दिसत आहे. अशातच या निवडणुकीच्या प्रचारासाठी खूप कमी कालावधी शिल्लक असल्याने पक्षाने पाच जिल्ह्यांमधील मतदारांशी संपर्क करण्यासाठी विधानसभानिहाय नियोजन तयार केले आहे.
Maharashtra BJP
Maharashtra BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 13 Oct : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक व पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील २५ विधानसभा मतदारसंघासाठी खास प्रभारी नियुक्त केले आहेत. यामध्ये पक्षाचे आमदार, माजी खासदार-आमदार यांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.

भाजपने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, प्रचारासाठी खूप कमी कालावधी शिल्लक असून, पाच जिल्ह्यांमधील मतदारांशी संपर्क करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विधानसभानिहाय नियोजन तयार केले आहे.

विधानसभा आणि प्रभारींचे नाव पुढील प्रमाणे : पुरंदर-पराग आळवणी, हडपसर - योगेश सागर, जुन्नर- मनोज कोटक, बारामती- सुरेश भोळे (राजुमामा), वडगाव शेरी - चित्रा वाघ, पिंपरी - प्रसाद लाड, भोर - विक्रांत पाटील, मावळ- संजय केळकर, आंबेगाव - विवेक कोल्हे, शिरूर- विक्रमसिंह पाचपुते, इंदापूर - अनुप अग्रवाल, खेड-आळंदी - माधवी नाईक, कागल - मंगेश चव्हाण, राधानगरी - प्रमोद जठार, पाटण - ज्ञानेश्वर म्हात्रे, तासगाव-कवठे महांकाळ - राजन नाईक

Maharashtra BJP
Pune BJP : भाजपच्या 100 हून अधिक नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला दांडी मारणं अंगलट

कोल्हापूर उत्तर - डॉ. सुजय विखे पाटील, ईश्वरपूर - कुणाल पाटील, पलूस-कडेगाव - प्रशांत ठाकूर, करवीर - श्रीकांत भारतीय, सांगोले - राजेश पाडवी, माळशिरस - अमोल जावळे, वाई - सीमा हिरे, माढा - राघवेंद्र पाटील, मोहोळ - डॉ. राहुल आहेर.

Maharashtra BJP
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंची FDA तून बदली? स्वत: पोस्ट करत संभ्रम केला दूर

नोंदणी जास्त पण आमदार नाहीत

पश्चिम महाराष्ट्रात जेथे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नाहीत अशा ठिकाणांपैकी २५ मतदारसंघात प्रभारींची नियुक्ती केली आहे. तसेच या मतदारसंघातील शिक्षक व पदवीधरांसाठीच्या मतदारांची संख्याही दीड-दोन हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांची मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात ताकद लावल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com