Pune BJP : भाजपच्या 100 हून अधिक नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला दांडी मारणं अंगलट

Pune BJP corporators : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह पक्षाचे आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
BJP Pune News | Ravindra Chavan | Show Cause Notice
BJP Pune News | Ravindra Chavan | Show Cause NoticeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 13 Oct : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुण्यात आले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला; पण पक्षाच्या १२६ नगरसेवकांपैकी शंभरहून अधिक जणांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे पहिला मिळाले. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्याच कार्यक्रमाला नगरसेवकांनी दांडी मारल्याची बाब आता त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या शंभर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशानंतरही गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना आता आपली बाजू मांडावी लागणार आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह पक्षाचे आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र, तरीही शंभरहून अधिक नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने पक्षांतर्गत चर्चेला सुरुवात झाली.

BJP Pune News | Ravindra Chavan | Show Cause Notice
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंची FDA तून बदली? स्वत: पोस्ट करत संभ्रम केला दूर

बिडकरांनी नावे नोंदवली; आता नोटिशीची वेळ!

महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची अनुपस्थिती लक्षात आल्यानंतर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी याची दखल घेतली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगरसेवकांची नावे नोंदवून घेण्याची सूचना त्यांनी केली. काही नगरसेवक कार्यक्रमस्थळी आले, मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच निघून गेल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे केवळ कार्यक्रमाला आलेल्या नगरसेवकांचीच नव्हे, तर प्रत्यक्ष उपस्थितीचीही नोंद घेण्यात आल्याची चर्चा आहे.

आता गैरहजर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नगरसेवकांनी कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करावे लागणार आहे. त्यामुळे नोटिशीला कोण काय उत्तर देणार आणि पक्षाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

BJP Pune News | Ravindra Chavan | Show Cause Notice
Someshwar Election: 'सोमेश्वर'वर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व; सर्व 21 जागा जिंकल्या, पुरुषोत्तम जगतापांचे 13 वर्षांचे वर्चस्व संपले! युगेंद्र पवारांनाही धक्का

१२६ नगरसेवक, पण कार्यक्रमाला पाठ!

महापालिकेतील चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाल्याने पक्षाची संख्या १२६ झाली. एवढे मोठे संख्याबळ असतानाही प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नगरसेवक गैरहजर राहिल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्यानंतरही नगरसेवक गैरहजर राहत असतील, तर त्याची दखल घेतली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता कारणे दाखवा नोटिशीच्या हालचालींमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. नगरसेवकांच्या खुलाशानंतर पक्ष काय निर्णय घेतो आणि या प्रकरणात पुढे कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com