

Tukaram Mundhe News, 13 Oct : अन्न व औषध प्रशासनच्या आयुक्तपदाचा कारभार हातात घेताच तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या कारवाईची चर्चा राज्यासह देशभरात सुरू आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्यावर राज्य सरकारने आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे.
एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांनीच ते सचिवपदी असावेत अशी मागणी केली होती. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंढेच या चौकशी आयोगाचे सचिव म्हणून काम करतील, अशी घोषणा केली.
यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, तुकाराम मुंढे यांच्याकडे एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिवपदाची जबाबदारी सोपल्यानंतर ते आता एफडीए आयुक्तपदी राहणार की त्यांची बदली झाली? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
याच पार्श्वभूमीवर खुद्द तुकाराम मुंढे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लोकांच्या मनातील शंकेचं निरसण केलं आहे. "माझी एफडीएमधून बदली झालेली नाही, मी एफडीएचा आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे." असं त्यांनी पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, "नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे." मुंढे यांनी स्वत:च त्यांची बदली झाली नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
कारण मुंढे एफडीएच्या आयुक्तपदी आल्यापासून त्यांनी अनेक हॉटेल आणि दुधात भेसळ करणाऱ्यांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे लोकांना आता आपल्यापर्यंत भेसळ नसलेलं दूध आणि खाद्य पदार्थ येत असल्याचा विश्वास निर्माण होत आहे. अशातच त्यांची बदली झाल्याच्या अफवेने अनेकांची चिंता वाढली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.