Sharad Pawar News : मुश्रीफांना भिडण्याची जबाबदारी घाटगेंकडेच! पवारांनी एका कृतीतूनच केलं स्पष्ट

Sharad Pawar’s Political Response Strategy : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीचा प्रश्न विचारताच त्यांनी मिश्किलपणे हास्य करत स्वतःच्या हातातील माईक त्यांनी घाटगे यांच्या हातात दिला.
Sharad Pawar addresses media queries by asking Samarjit Ghatge to respond on the ED clearance granted to Hasan Mushrif.
Sharad Pawar addresses media queries by asking Samarjit Ghatge to respond on the ED clearance granted to Hasan Mushrif. Sarkarnama
Published on
Updated on

ED's Report on Hasan Mushrif : ईडीच्या कारवाईमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाल्याचा दावा मुश्रीफ गटांकडून करण्यात येत आहे. मात्र याच दाव्यावरून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांना कोणताच दिलासा मिळाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कागलच्या राजकारणात खळबळ उडाली असताना, कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील चांगलीच गुगली घेतलेली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीचा प्रश्न विचारताच त्यांनी मिश्किलपणे हास्य करत स्वतःच्या हातातील माईक त्यांनी घाटगे यांच्या हातात दिला. त्यांच्या या कृतीमुळे मात्र पत्रकार परिषदेत हशा उमटला. शरद पवार यांनी यांच्या हातात माईक देताच घाटगे यांनी देखील त्यावर हसून दाद दिली.

मी कालच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर तुम्हीच बोलावे, अशी विनंती घाटगेंनी केली. त्यांनी पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या हातात माईक घेतला. या कृतीमुळे मात्र चांगलीच चर्चा रंगली होती. कोणतीही कृती करण्यामागे पवारांचा काही ना काही हेतू असतो, असे महाराष्ट्राच्या राजकारणात बोलले जाते. त्यामुळे मुश्रीफांबाबतच्या प्रश्नावर घाटगेंना बोलायला सांगण्यामागे त्यांचा काय हेतू असावा, मुश्रीफांना घाटगेच टक्कर देऊ शकतात, असे तर पवारांना सांगायचे नव्हते ना, अशी चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar addresses media queries by asking Samarjit Ghatge to respond on the ED clearance granted to Hasan Mushrif.
Zohran Mamdani video : मुंबई नव्हे न्यूयॉर्क महापौरांची निवडणूक; ममदानींच्या मोदींविषयीच्या विधानांमुळे भारतात खळबळ...

समरजीत घाटगे यांची भूमिका काय?

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना क्लिन चीट मिळाल्याचा दावा मुश्रीफ गटाकडून केला जात आहे. मात्र त्यावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे आणि महत्त्वाचा खुलासा देत मंत्री मुश्रीफांना इशारा दिला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना या केसमध्ये कोणताच दिलासा मिळालेला नाही.

समरजीत घाटगे ही केस कुठेही जाऊ देणार नाही, मी कायदेशीर बोलतो, ही केस चालू राहणार, या सभासदांना न्याय मिळण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचा इशारा घाटगे यांनी दिला आहे. दरम्यान, क्लिन चीटबाबत हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

Sharad Pawar addresses media queries by asking Samarjit Ghatge to respond on the ED clearance granted to Hasan Mushrif.
Zohran Mamdani video : मुंबई नव्हे न्यूयॉर्क महापौरांची निवडणूक; ममदानींच्या मोदींविषयीच्या विधानांमुळे भारतात खळबळ...

परमेश्वर महान आहे. असं म्हणतात की आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखी, त्यामुळे माझ्या गायी सुद्धा परमेश्वर राखत असावा. गोरगरिबांचा आशीर्वाद, राजर्षी शाहू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी सुरू असतानाच मला हा दिलासा मिळाला. मला बाकी काही बोलायचे नाही. पण मी परमेश्वराचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com