

सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असून उमेदवारीची यादी अखेरच्या दिवशी (17 नोव्हेंबर) जाहीर करण्याची रणनीती आखली आहे.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याने उमेदवारीसाठी चुरस वाढली असून बंडखोरी टाळण्यासाठी आणि नेते विरोधकांकडे वळू नयेत म्हणून यादी उशिरा जाहीर केली जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्व 12 ठिकाणी भाजप विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला असून शिवसेना (शिंदे गट) नेते दिग्विजय बागल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Pandharpur, 15 November : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचे पडघम जोरजोरात वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एक नगर पंचायतीची निवडणूक भाजप स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, भाजपसह सर्व पक्षांची उमेदवारांची यादी अद्याप जाहीर होऊ शकलेली नाही. भाजपची यादी आज जाहीर होणार होती. मात्र बंडखोरी टाळण्यासाठी आणि आपले मातब्बर नेते विरोधकांच्या गळाला लागू नयेत, यासाठी भाजपने नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आज जाहीर करण्यात येणार होती. मात्र, संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी तसेच पक्षातील मातब्बर नेते विरोधकांच्या गळाला लागू नयेत, यासाठी भाजपकडून सावध पावले टाकली जात आहेत.
भारतीय जनता पक्षात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इनकमिंंग होत आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. एकाला उमेदवारी दिल्यास अनेकजण नाराज होऊ शकतात. त्यातील महत्वकांक्षी नेते विरोधकांच्या तसेच मित्रपक्षाच्या गळाला लागू शकतात, त्यामुळे भाजपनेही वेगळी रणनीती आखली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच येत्या सोमवारी (ता. १७ नोव्हेंबर) भाजपकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत, असे सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात बोलताना सांगितले आहे, त्यामुळे इच्छुकांना आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच विरोधकांना गाफील ठेवण्याचाही भाजपची रणनीती असू शकते.
जयकुमार गोरे म्हणाले, बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. महाराष्ट्रात देखील सर्व समाजाचे लोक भाजपसोबत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील बाराही ठिकाणी भाजपचे कमळ फुलेल, असा विश्वास आहे.
नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत. प्रदेश पातळीवरून सर्व उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व 12 नगरपालिकांच्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे, तशी आमची तयारी झाली आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केले.
दिग्विजय बागल हे लवकरच भाजपत
करमाळ्याचे शिवसेना (शिंदे गट) नेते दिग्विजय बागल हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस अधिक गतीने सुरू असल्याचा दावाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे
1) भाजप उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार आहे?
भाजप उमेदवारांची यादी उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 17 नोव्हेंबरला जाहीर करणार आहे.
2) यादी उशिरा जाहीर करण्यामागे कारण काय आहे?
बंडखोरी टाळणे आणि पक्षातील मातब्बर नेते विरोधकांकडे जाऊ नयेत हे मुख्य कारण आहे.
3) भाजप किती नगरपालिका स्वबळावर लढवणार आहे?
सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी सर्व नगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
4) कोणते नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत?
शिवसेना (शिंदे गट) नेते दिग्विजय बागल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.