Ashok Chavan Vs Rahul Gandhi : ‘पळू नका, लपून बसू नका’ : राहुल गांधींना चव्हाणांनी डिचवताच, काँग्रेसचा पलटवार; ‘कुचू-पुचू’ म्हणत सुनावले!

Ashok Chavan challenges Rahul Gandhi, while Congress hits back over the Parliament row : संसदेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी ‘पळू नका, लपून बसू नका’ म्हणत राहुल गांधींना चर्चेला सामोरे जाण्याचे आव्हान दिले; काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करत भाजपला घेरले.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Congress BJP political fight : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र होत असताना, भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत राहुल गांधींना ‘पळू नका, लपून बसू नका; चर्चेला सामोरे जा, सत्याला सामोरे जा’, असे आव्हान दिले. त्यांच्या या पोस्टवर काँग्रेसनेही आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू असून विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या प्रकरणावर संसदेत निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय अयोध्येतील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसने (Congress) सरकारला प्रश्न विचारले आहेत. या मुद्द्यांवरून संसदेत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Ashok Chavan
Mahayuti dispute : महायुतीच्या मंचावरच ‘फालतूगिरी’चा वाद; पारनेरमध्ये सावंत-कोरडे भिडले, दातेंची ‘शेवटची वॉर्निंग’

या पार्श्वभूमीवर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर अमित शाह संसदेत उत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्यावरही राजकीय निशाणा साधला जात असल्याचे चित्र आहे.

Ashok Chavan
Aadhaar Card Name Mistake : आधार कार्डची 'ही' एक चूक पडू शकते महागात; थांबू शकतात सरकारी लाभ

अशोक चव्हाणांनी राहुल गांधींना डिचवलं

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे राज्यसभा खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर राहुल गांधींना उद्देशून पोस्ट केली. ‘राहुल गांधी, पळू नका, लपून बसू नका. चर्चेला सामोरे जा, सत्याला सामोरे जा!’ अशा आशयाच्या या पोस्टमधून त्यांनी राहुल गांधींना संसदेत चर्चेला सामोरे जाण्याचे आव्हान दिले. अशोक चव्हाण यांच्या या टीकेनंतर काँग्रेसकडूनही त्यांना थेट प्रत्युत्तर देण्यात आले.

काँग्रेसचे अशोक चव्हाणांना जोरदार प्रत्युत्तर

काँग्रेसने अशोक चव्हाण यांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘अशोकराव, तुमचे दिल्लीतले ‘कुचू आणि पुचू’ एवढे दिवस त्याच राहुल गांधींना घाबरून संसदेत येत नव्हते.’ पुढे काँग्रेसने भाजपला लक्ष्य करत, आता संसदेत येऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असा टोला लगावला. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा संदर्भ देत, ‘खिळे लावलेल्या लाठ्या आणि पॅलेट गन्स चालवण्याचे आदेश कोणी दिले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याची माहिती नव्हती का?’ असा सवालही काँग्रेसने केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com