BJP leadership reviews ministers : विधान परिषदेमधील पराभव भाजपच्या जिव्हारी! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अ‍ॅक्शन मोडवर, 'ते' मंत्री निशाण्यावर, अहवाल...

BJP reviews ministers' performance News : निवडणूक निकालानंतर भाजपकडून मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची कानउघाडणी करण्यात आली.
Devendra fadnavis, ravindra chavan
Devendra fadnavis, ravindra chavan Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : नुकत्याच झालेल्या राज्यातील विधान परिषद निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात भाजप व महायुतीला यश मिळाले नाही. त्याठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या पाच जागांवरील निवडणूक निकालात तीन जागा जिंकत महाविकास आघाडीने बाजी मारली.

राज्यात महायुतीची सत्ता असताना महाविकास आघाडीने विजय मिळवल्याने भाजपकडून आता मंत्र्यांची झाडाझडती सुरू झाली आहे. त्याच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे मंत्र्यांचे टेन्शन वाढणार आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये (BJP) मंत्र्यांची झाडाझडती सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मागवण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर भाजपकडून मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची कानउघाडणी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या कामाचा अहवाल देखील मागविण्यात आला असल्याचे समजते

त्यामध्ये मंत्री म्हणून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी काय केले? याचा लेखाजोखा मांडण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करून बैठकीला उपस्थित राहण्याचे सर्व मंत्र्यांना पक्ष नेतृत्वाने आदेश दिलेत. पक्ष संघटना सर्वोच्च आहे आणि संघटनेमुळेच आपण मंत्री आहोत हे विसरू नका, असा स्पष्ट इशारा रवींद्र चव्हाण (Ravaindra Chavan) यांनी मंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे आता सर्वच मंत्री अहवाल सदर करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

Devendra fadnavis, ravindra chavan
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, या दोन्ही मतदारसंघात भाजपला विजयाची आशा होती. मात्र, याठिकाणी भाजपला महायुतीमधील मित्रपक्षाची साथ मिळूनही यश मिळाले नाही. या हक्काच्या दोन्ही मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या पराभवानंतर लगेचच भाजपने आमदार व नगरसेवकांची बैठक बोलावून त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर आता भाजपकडून मंत्र्यांची झाडाझडती सुरू झाली आहे. त्याच्या कामाचा आढावा घेतला जात असून सात दिवसात अहवाल मागवल्याने मंत्र्यांचे टेन्शन वाढणार आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Eknath Shinde Shiv Sena Rada Case : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 'राडा' प्रकरणात सरकारचा 48 तासांत यू-टर्न! विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती अचानक रद्द; पालघरमध्ये राजकीय चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.