Gunratna Sadarvarte News: मोठी बातमी: भाजपचा गुणरत्न सदावर्तेंना दणका? नव्या एसटी संघटनेची घोषणा, अध्यक्षपदी कुणाची वर्णी?

Maharashtra ST Worker : भाजपनं आता नव्या एसटी कर्मचारी संघटनेची स्थापना केली आहे. यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलची सत्ता असलेली एसटी संघटनाच एकमेव होती. आता भाजपकडून 'एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य' ही नवी संघटना स्थापन करण्यात आली आहे.
Gunratna Sadavarte BJP
Gunratna Sadavarte bjp.jpgSarkarnama
Published on
Updated on

Gunratna Sadarvarte Latest News : वकील गुणरत्न सदावर्ते हे आरोप-प्रत्यारोपांमुळे सातत्यानं चर्चेत असतात. सरकारला अडचणीत आणणाऱ्या विविध मुद्द्यांवरुन ते भाजपशी मिळतीजुळती भूमिका घेत अनेकदा विरोधकांवर टीकेची तोफ डागताना दिसून येतात. मात्र, आता भाजपनेच गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का दिला आहे.

भाजपनं आता नव्या एसटी कर्मचारी संघटनेची स्थापना केली आहे. यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलची सत्ता असलेली एसटी संघटनाच एकमेव होती. आता भाजपकडून 'एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य' ही नवी संघटना स्थापन करण्यात आली आहे.

भाजपकडून नव्या एसटी कामगार संघटनेची घोषणा करताना गुणरत्न सदावर्तेना साईडलाईन केल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या या नव्या एसटी संघटनेचं नेतृत्व विजय मालोकार यांच्याकडे असणार आहेत. सदावर्ते यांना बाजूला ठेवत भाजपनं नवी संघटना स्थापन केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

एसटी कामगारांच्या अनेक मुद्द्यांवरुन भाजपनं स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे. अकोल्यात भाजप प्रणित ‘एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ही संघटना श्रम भारतीय जनता कामगार महासंघाशी संबंधित आहे.

Gunratna Sadavarte BJP
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच सरकारची मोठी ओवाळणी! 1500 रुपये खात्यात जमा!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक संपामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका बजावत नेतृत्व केले होते.

तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलनं एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत शरद पवारांच्या पॅनेलचा पराभवाचा धक्का दिला होता. एसटी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या सदावर्ते यांच्या पॅनेलनं सत्ता स्थापन केली होती. परंतु, त्यानंतर बँकेच्या कारभारावरून त्यांच्यावर मोठे करण्यात आले होते.

Gunratna Sadavarte BJP
Municipal Corporation News : महापालिकेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोर नगरसेवक हमरीतुमरीवर; गोंधळ पाहून मुलं झाली कावरीबावरी...

माजी खासदार व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व एसटी कामगार संघटनेनं गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावर बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, नियमबाह्य भरती आणि महागड्या सॉफ्टवेअर खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

याचदरम्यान, आनंदराव आडसूळ व एसटी कामगार संघटनेच्या आरोपांची गंभीर दखल घेत राज्याच्या सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला होता. सहकार विभागाने सदावर्ते व त्यांच्या पत्नीचे तज्ज्ञ संचालकपद रद्द केले. तसेच काही वादग्रस्त भरती प्रक्रियांना स्थगिती देत दणके दिले होते.

Gunratna Sadavarte BJP
Mumbai MLAs Report Card : मुंबईत महायुतीची हवा टाईट! एकनाथ शिंदेंच्या आमदारांची सर्वात खराब कामगिरी; रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसचा 'डंका'

मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. हा राडा वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचं समोर आलं होतं.

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचे दावे-प्रतिदाव्यावरुन या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी भ्रष्टाचार आणि अश्लील वर्तवणूक आरोप, बाहेरुन माणसं बोलावत मारहाण झाल्याचा आरोप दोन्ही संघटनांकडून एकमेकांवर करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com