BJP Maharashtra President Announcement : भाजपचं ठरलं! प्रदेशाध्यक्षाची लवकरच घोषणा; मुंबई अध्यक्षपदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत

BJP Mumbai President Candidates News : जून महिन्यातच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे तर दुसरीकडे मुंबई अध्यक्षपदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत असून त्यापैकी एका नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यापासनूच भाजपने संघटनात्मक निवडणुकीवर भर दिला आहे. राज्यात 'संघटन पर्व' मोहीम राबवण्यात आली. ज्यामुळे पक्षाचे गटस्तरावरील बळ वाढले आहे.

महाराष्ट्र राज्याला दीड कोटी नव्या सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते. हे टार्गेट पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर बूथ कमिटी, मंडलअध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अशा निवडी आतापर्यंत पार पडल्या आहेत. त्यामुळे आता जून महिन्यातच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे तर दुसरीकडे मुंबई अध्यक्षपदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत असून त्यापैकी एका नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Vaishnavi Hagwane case : मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, ‘’कुणालाही दबाव आणू देणार नाही अन्...’’

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांच्याकडे महसूलमंत्री पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागी भाजपकडून रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्याची अधिकृत घोषणा जून महिन्यात केली जाणार आहे. त्यांच्याकडे निवडी पूर्वीच राज्यातील 'संघटन पर्व' मोहीमची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली होती. चव्हाण यांनी ही जबाबदारी पार पाडली.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; राज्य सरकारचा 'IG' जालिंदर सुपेकरांना 24 तासांच्या आतच दुसरा झटका

आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आतापर्यंत डोंबिवलीचे चार वेळा प्रतिनिधीत्त्व केला आहे. तर यापूर्वी सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे येत्या काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. सध्या ते भाजपचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता चव्हाण यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Thackeray brothers : महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार; महायुती अन् आघडीला मिळणार पर्याय! ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता किती?

मुंबई शहरचे सध्याचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे, त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम व अतुल भातखळकर या तीन नावांवर चर्चा झाली असल्याचे समजते.

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव चर्चेत आहे. दरेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या राजकारणातील त्यांचा अनुभव आणि आक्रमक भूमिका लक्षात घेता, अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Manikrao Kokate Controversy : 'कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी', माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले अमित साटम यांच्या नावाची ही चर्चा आहे. माजी नगरसेवक असलेले साटम यांना मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे हे जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार अतुल भातखळकर यांचे नाव चर्चेत आहे. संघटनात्मक कामात सक्रिय असलेले भातखळकर यांचे नावही अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मुंबईत बळकटी मिळू शकते, असे मानले जात आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Sadabhau Khot : 'ओसाड गावची पाटीलकी? अन् ढेकळांचे पंचनामे' कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार भडकला? कोकाटेंना म्हणाला, 'संवेदनशील...'

येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच भाजपकडून लवकरच नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची 3 शब्दांतच विषय संपवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com